औरंगाबाद : पुणे येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत रोहित पवार यांची नुकतीच अध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली. तसेच मराठवाड्याचे सचिन मुळे आणि राजू काणे यांचीही मध्य विभागातून अपेक्स कौन्सिल कमिटीत बिनविरोध निवड झाली. परभणीचे संतोष बोबडे यांची सहसचिव म्हणून निवड झाली आहे.
उद्योजक सचिन मुळे हे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव आहेत. महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणारे सचिन मुळे याआधी २०१३ ते २०१८ या कालावधीतही एमसीएच्या मॅनेजिंग कमिटीत होते. त्याचप्रमाणे अनेक वर्षे एमसीएच्या १६ व १४ वर्षांखालील गटात प्रशिक्षक, निवड समितीत असणारे राजू काणे हेदेखील जालना जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : रोहित पवार, उपाध्यक्ष : किरण सामंत, सचिव : शुभेंद्र भांडारकर, सहसचिव : संतोष बोबडे कोषाध्यक्ष : संजय बजाज. शिखर समिती सदस्य : सचिन मुळे, राजू काणे (मध्य विभाग), संतोष बोबडे, अजय देशमुख (पूर्व विभाग), राजवर्धन कडंबंडे, अतुल जैन (उत्तर विभाग), कमलेश पिसाळ, सजय बजाज (दक्षिण विभाग), किरण सामंत, सुशील शेवाळे (पश्चिम विभाग). तसेच यात लाईफ मेंबर म्हणून सुहास पटवर्धन, शुभेंद्र भांडारकर, फाउंडर व स्पेशल जिमखानामधून विनायक द्रविड, इन्स्टिट्यूशन (कॉलेजेस) मधून केशव वझे, तसेच संलग्नित क्लबमधून रोहित पवार व सुनील मुथा यांचीही ॲपेक्स कौन्सिल कमिटीत निवड झाली आहे.
मराठवाड्यातील गुणवत्तेला न्याय मिळेलबीसीसीआयच्या आचारसंहितेनुसार एमसीएची निवडणूक झाली आहे. नवनियुक्त कार्यकारिणीत उत्साह भरपूर आहे. ही कार्यकारिणी प्रतिभवान खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील गुणवत्तेला न्याय मिळेल. तसेच औरंगाबादेतील क्रिकेटलाही चालना मिळेल.-सचिन मुळे, अपेक्स कौन्सिल कमिटी सदस्य