शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सचिन तेंडुलकर ४५ मिनिटे औरंगाबाद विमानतळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:34 AM

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर रात्री ८.४५ वाजता विमानाने सचिन पुन्हा मुंबईला परतला. यानिमित्ताने सचिन औरंगाबादेत दाखल झाला; परंतु केवळ ४५ मिनिटांसाठीच.

ठळक मुद्देनागपुरात खराब वातावरण : चार्टर प्लेन उतरले चिकलठाणा विमानतळावर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर रात्री ८.४५ वाजता विमानाने सचिन पुन्हा मुंबईला परतला. यानिमित्ताने सचिन औरंगाबादेत दाखल झाला; परंतु केवळ ४५ मिनिटांसाठीच.नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सवाचा शनिवारी सायंकाळी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सचिन तेंडुलकरची उपस्थिती हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्यासाठी सचिनने मुंबई येथून सायंकाळी चार्टर प्लेनने नागपूरसाठी उड्डाण घेतले; परंतु नागपूर येथील वातावरण खराब झाले होते. त्यामुळे नागपूरजवळ पोहोचलेले सचिनचे विमान औरंगाबादला वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रात्री ८ वाजेच्या सुमारास विमान चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर विमानतळावर आल्याची माहिती विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांपर्यंत पोहोचली. सर्वांनी सचिनची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला.विमानतळावर दाखल झाल्यानंतर काही वेळेनंतर सचिन विमानाच्या बाहेर पडला आणि क्रिकेट विश्वातील देव मानल्या जाणाºया मास्टरब्लास्टरचे सर्वांना दर्शन घडले. अंगात ग्रे रंगाचा शर्ट घातलेल्या सचिनने लक्ष वेधून घेतले.विमानतळावरील अधिकारी-कर्मचाºयांबरोबर सचिनने संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटोशेसनही केले. यादरम्यान अधूनमधून सचिन मोबाईलवरही संवाद साधत होता. जवळपास १५ ते २० मिनिटे तो विमानाच्या बाहेर होता. सचिन विमानतळावर असल्याची माहिती मिळाल्याने काहींनी लहान मुलांसह विमानतळावर धाव घेतली होती; परंतु सचिन विमानतळाच्या आतमध्येच असल्याने त्यांची निराशा झाली.विमान औरंगाबादला वळविण्यात आल्याने विमानातील इंधन कमी झाले होते. त्यामुळे विमानतळावर चार्टर प्लेनमध्ये इंधन भरण्यात आले. जवळपास ४५ मिनिटे थांबल्यानंतर सचिन मुंबईसाठी रवाना झाला. रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरAurangabadऔरंगाबादAirportविमानतळ