छत्रपती संभाजीनगर: शहरातील टीव्ही सेंटर परिसर असे नमूद केलेला एक व्हिडीओ मंगळवारपासून सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडीओत एक विक्रेता रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पोते भिजवतो आणि काही अंतरावर जाऊन हातगाडीवरील केळीवर ते पोते झाकतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला.
हा व्हिडीओ टीव्ही सेंटर येथील असल्याचा दावा अनेकांनी केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या विक्रेत्याचा परिसरात शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. टीव्ही सेंटर भागात अनेक फळ विक्रेते आहेत. जे स्वच्छतेचे पालन करून उदरनिर्वाह करतात. एका विक्रेत्यामुळे इतर विक्रेत्यांविषयी गैरसमज करून घेऊ नये, कुठलीही वस्तू घेण्यापूर्वी ती खाण्यायोग्य आहे का, याची तपासणी करावी, असे आवाहन अनेकांनी सामाजिक माध्यमांतून केले.
पोलिसांनी शोधून काढले 'त्या' विक्रेत्यालायाप्रकरणी मनसेचे विभागप्रमुख चंदू नवपुते यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर विक्रेता अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी विक्रेत्याला शोधून काढत गुन्हा अदखलपात्र असल्याने त्याला समज देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.