शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मेहदीला पळवून नेण्याच्या कटातील सद्दाम अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:53 AM

कुख्यात सुपारी किलरला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याच्या कटात सहभागी आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कटकटगेट परिसरात अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुख्यात सुपारी किलरला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याच्या कटात सहभागी आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कटकटगेट परिसरात अटक केली.शेख सद्दाम शेख इमाम (२८, रा. युनूस कॉलनी, कटकटगेट) असे आरोपीचे नाव आहे. इम्रान मेहदी याला २७ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर केले जाणार होते. त्या दिवशी पोलिसांवर गोळीबार करून मेहदीला पळवून नेण्याचा कट आरोपींनी रचला होता. गुन्हे शाखेने २७ आॅगस्ट रोजी नारेगाव चौकाजवळ सापळा रचून नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून गावठी पिस्टल आणि ८ काडतुसे जप्त केली. यात मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटरचा समावेश होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर चार दिवसांनी आणखी आफताब ऊर्फ विजय चौधरी आणि मुसा चाऊस यास पकडले. त्यांच्याकडूनही १० काडतुसे आणि एक गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले होते. आरोपी शेख सद्दाम हा इम्रान मेहदी समर्थक आहे. तो घटनेच्या दिवशी मध्यप्रदेशातील टोळीच्या संपर्कात होता, यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो सारखा पोलिसांना चकमा देत होता. आज दुपारी तो कटकटगेट परिसरात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, सुनील धात्रक, गजानन मांटे, प्रभाकर राऊत आणि विशाल सोनवणे यांच्या पथक ाने आरोपीला बेड्या ठोकल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक