औरंगाबाद : मसाला दुधाची ( Milk ) शान व जान असलेले केशर सध्या दीड लाख रुपये किलो दराने विकले जात आहे. मागील दोन वर्षांची तुलना करता केशरच्या किमती निम्म्याने घटल्या ( Saffron prices fell by half) आहेत. यामुळे यंदाच्या कोजागरी पाैर्णिमेला ( Kojagiri Pournima ) मसाला दुधात केशरची मात्रा अधिक दिसली, तर नवल वाटायला नको.
वर्षभरातील सर्वाधिक दूध कोजागरी पौर्णिमेला विकले जाते. यंदा मंगळवारी (दि.१९) कोजागरी पौर्णिमा साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात केशरची १० किलोपेक्षा अधिक आवक झाली आहे. मसाला दुधात केशर टाकले की, त्यास केशरी रंग व सुगंध येतो, किरकोळ विक्रीत केशर १ लाख ६० हजार रुपये किलोने विक्री होत असले तरी दुधात टाकण्यासाठी कोणी एक किलो खरेदी करत नाही. अर्धा ते एक ग्रॅम केशर पुरेसे होते. अर्धा ग्रॅम ८० रुपये, तर एक ग्रॅम १५० रुपयांची डबी विकत घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी केशरचा भाव अडीच लाख रुपये किलोपर्यंत होता; पण कोरोना काळात भाव घटले. यामुळे किरकोळ विक्रीत एक ग्रॅमचा भाव २५० रुपयांहून कमी होऊन १५० रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. देशात फक्त जम्मू- काश्मीर येथेच केशरचे उत्पादन होते. याशिवाय जगात इराण व अफगणिस्तानातूनही केशर येते, अशी माहिती वितरक विलास साहुजी यांनी दिली.
शहरात ८ ते १० लाखांची उलाढालशहरात दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला केशरच्या विक्रीत ८ ते १० लाख रुपयांची उलाढाल होते. भाव १ ग्रॅममागे १०० रुपयांनी कमी झाला. उलाढालीत ३० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे, असे होलसेल विक्रेत्यांनी नमूद केले.
सावधान, होऊ शकते फसवणूकआपण केशर खरेदी करताय, मग थोडे सावध व्हा. कारण, बाजारात डुप्लिकेट केशरही विक्री होत आहे. असली व नकली केशरमधील फरक
जाणून घ्या : असली केशर नकली केशर
१) दुधात केशरचे तंतू लांब होतात, तुटत नाहीत. १) तंतू तुटतात.२) दुधात टाकल्यावर हळूहळू रंग सोडतो २) एकदम रंग सोडून देतो.३) दुधात टाकल्यावर सुगंध येतो. ३) सुगंध येत नाही.४) केशर सोनेरी रंग येतो. ४) पिवळा किंवा लाल रंग.५) केशर विरघळत नाही, लवचिक बनते. ५) केशर विरघळून जाते.