शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

धुपखेडा येथे साईभक्तांची मांदियाळी

By admin | Published: July 11, 2017 12:17 AM

बिडकीन : साईबाबांची प्रकटभूमी श्रीक्षेत्र धुपखेडा येथील श्री साईबाबा सेवा साधनाश्रम व साई विश्वस्त ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवसाजरा करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कबिडकीन : साईबाबांची प्रकटभूमी श्रीक्षेत्र धुपखेडा येथील श्री साईबाबा सेवा साधनाश्रम व साई विश्वस्त ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव देशभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.साईभक्त तथा प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व साईभक्तांच्या सौजन्याने स्वामी बलदेव भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबांचे प्रथम भक्त चांद पटेल यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करुन लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सहकाररत्न अंबादासराव पाटील मानकापे, सुनील इंगळे पाटील, संजय टेलर दौंडे, नरेंद्र नाशेरकर, चाँद पटेल यांचे वंशज चाँद बालम पठाण, बाबुलाल पठाण, ह.भ.प.एकनाथ महाराज राजूरकर, पांडुरंग तात्या वाघचौरे, मोहनराव वाघचौरे, सुनील भागवत, ज्ञानेश्वर भुकेले, नितीन मड्डमवार, सुनील वाघचौरे, अशोक कमल पाल, बबनराव ठाणगे, ज्ञानेश्वर औटी, चेअरमन श्रीरंग पा.वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.४ जुलैपासून श्री गुरुचरित्राचे सामूहिक पारायण वे.शा.सं. शुभम देवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रविवारी सकाळी श्रींचे मंगलस्नान, अभिषेक, आरती, श्री गणेश याग, तसेच सकाळी दहा वाजता साईस्वरांजली या साईभक्ती गिताचा कार्यक्रम साईशाहीर ह.भ.प. सुनील महाराज वाघचौरे यांनी सादर केला. साईरुद्रा मिशनचे नरेंद्र नाशेरकर यांनी संगीतमय साईकथा व गुरुचे महत्त्व सांगितले.दिन्नापूर येथील श्रद्धा खणसे या गुणवंत विद्यार्थिनीचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वामी बलदेव भारती यांचे भक्तांनी पूजन केले. आरती व महाप्रसादाचे यजमान शिवानंद सोड्डी व गुरुनाथ बिरादार यांनी महाप्रसाद वाटप केला.याप्रसंगी अशोक कमलपाल, संतोष खणसे, कृष्णराव जोशी, श्रीधर देवढे, केशवराव खणसे, सुदाम चव्हाण, प्रकाश मुळे, रामनाथ कराळे, दादासाहेब खणसे, शिवाजी गव्हाणे, कांताभैय्या, बंडू पा.कागदे, भीमराज टेके, विष्णूपंत साटोटे, मंगला पवार, अशोक सुब्रह्मण्यम फरिदाबाद, श्रीनिवासन, सद्धेश्वर भालेकर, राजू गायकवाड, दिनेश गायकवाड , विजय खराडकर, लक्ष्मण देवा बोरुडे, जगदाळे आदींसह हजारो साईभक्तांनी परिश्रम घेतले. तसेच साईबाबा विश्वस्त ट्रस्टच्या वतीने ह.भ.प. एकनाथ महाराज राजूरकर व ह.भ.प. गणपत महाराज यांचे प्रवचन व पूजनाचा कार्यक्रम होऊन रामराव पा.मुळे यांच्या वतीने भारत मुळे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.