लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी महिना संपत आला तरी झालेले नाही. वेतनाची अनियमितता, मिळणारी कमी रक्कम, ‘पीएफ ’चा अभाव अशा कारणांमुळे मंगळवारी कर्मचा-यांनी काम बंदचा पवित्रा घेतला. जवळपास दोन तास काम ठप्प होते. दोन दिवसांत वेतन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर परतले.घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची तब्बल १७५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सफाईगार तथा चतुर्थश्रेणीची कामे करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी नोंदणीकृत पुरवठादारांकडून ६० कर्मचारी घेण्यात आले. मेमर्स विद्युत मंडळ माजी अॅप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सोसायटीला कंत्राट मिळाले. ५ आॅक्टोबरपासून कर्मचारी रुजू झाले; परंतु प्रत्येक महिन्याला वेतनासाठी १५ ते २० तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्यातक्रारी कर्मचाºयांकडून होत आहेत. जानेवारी महिन्यातील वेतन फेब्रुवारी महिना संपत झाला तरी झालेले नाही. त्यामुळे घर खर्च कसा करावा, असा प्रश्न कर्मचाºयांना पडला आहे. संतापाने कर्मचाºयांनी काम बंदचा पवित्रा घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्याकडे धाव घेत वेळेवर वेतन करण्याची मागणीकेली.रुजू होऊन चार महिने उलटूनही अद्यापही वेतन स्लीप, पीएफ क्रमांक मिळत नसल्याची तक्रार कर्मचाºयांनी केली. घाटी प्रशासनाकडून पेमेंट न मिळाल्याने कर्मचाºयांचे वेतन झालेले नाही; परंतु दोन दिवसांत वेतन केले जाईल, असे कं त्राटदाराने सांगितले. दोन दिवसांत वेतनाचा प्रश्न सुटेल, असे भारत सोनवणे यांनीही सांगितले.
औरंगाबादच्या घाटीतील कंत्राटी कर्मचा-यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:19 AM
घाटी रुग्णालयातील कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी महिना संपत आला तरी झालेले नाही. वेतनाची अनियमितता, मिळणारी कमी रक्कम, ‘पीएफ ’चा अभाव अशा कारणांमुळे मंगळवारी कर्मचा-यांनी काम बंदचा पवित्रा घेतला. जवळपास दोन तास काम ठप्प होते. दोन दिवसांत वेतन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर परतले.
ठळक मुद्देकाम बंदचा पवित्रा: जानेवारीचे वेतन होईना