लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा परतीचा पाऊस चांगला असला तरी, अजूनही जिल्ह्यातील २७ तलावांत मुबलक जलसाठा झाला नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संस्थाचालकांनी मत्स्यबीज खरेदीकडे सध्यातरी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ७० लाख मत्स्यजिºयांचे उत्पादन झाले असून त्यातील ५४ लाख जिºयांची विक्री शासकीय दराने करण्यात आली.जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय वाढावा व या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु निसर्ग साथ देत नसल्याने जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला घरघर लागत आहे. शासकीय उपाय-योजना नियोजन करून राबविण्यात येत असल्या तरी तलावात पाणीच नसल्यामुळे संबंधित संस्थाही मत्स्य बोटुकले खरेदीस धजावत नाहीत. त्यामुळे सध्यातरी संस्थांकडून मागणी नसल्याचे दिसून येत आहे. परंतु सध्या अधून-मधून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे तलाव भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक मत्स्य बोटुकल्यांची मागणी संस्थाकडून वाढू शकते, असे मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून सांगण्यात आले.
५४ लाख मत्स्यजिºयांची शासकीय दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:45 AM