शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 7:29 PM

Martyr Kailash Pawar : शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. यावेळी लष्करातर्फे त्यांच्या पार्थिवास सलामी देण्यात आली.

ठळक मुद्देलष्कराच्या तुकडीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर येणार होते

औरंगाबाद : सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून खाली कोसळल्यामुळे लष्करातील जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आले. चिखली (जि. बुलडाणा) येथील वीरपुत्र शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. लष्कराच्या तुकडीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली.

पवार यांची ड्युटी १ ऑगस्टला संपली होती. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर ते चिखलीला येणार होते. मात्र, बर्फाळ डोंगर उतरताना दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी दिल्लीहून मुंबईमार्गे औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्कारातर्फे त्यांना सलामी देण्यात आली. याप्रसंगी ब्रिगेडियर उपेंदरसिंग आनंद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, तहसीलदार ज्योती पवार, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे ‘सीआयएसएफ’चे जवान उपस्थित होते. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होतीचिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे गेल्या २ आॅगस्ट २०२० पासून महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. हिमालय पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अश्या अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. अश्या अत्यंत दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात कैलास पवार यांची एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होती. 

सियाचीन येथे होते तैनात आपल्या सहकाऱ्यांसह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. त्यानुषंगाने त्यांचा प्रवास सुरू होता. दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते बर्फावरून घरंगळत जावून खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या जवानांनी त्यांना तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतू, उपचारादरम्यान १ आॅगस्ट रोजी कैलास पवार यांची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :MartyrशहीदAurangabadऔरंगाबादbuldhanaबुलडाणाIndian Armyभारतीय जवान