स्वाती काळेगावकर वरद गणेश मंदिराजवळील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी सासू, जाऊ आणि मैत्रिणीसह पायी जात होत्या. मंदिरापासून काही अंतरावर गल्लीत त्या सर्वजणी असताना दुचाकीस्वार दोघे त्यांच्याजवळून गेले. यानंतर ते दुचाकीस्वार पुढे जाऊन वळून त्यांच्या दिशेने आले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने अचानक स्वाती यांच्या गळ्यातील सव्वा चार तोळ्याची सोन्याची पोत झटका देऊन तोडून घेतली. यानंतर चोरटे सुसाट वेगाने तेथून पसार झाले. यावेळी त्यांनी आरडाओरड करीत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी संशयिताचे वर्णन तक्रारदार यांच्याकडून घेतले.
चौकट १
मंगळसूत्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
समर्थनगर तसेच वाळूज महानगर येथील घटनांमध्ये पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तेव्हा चोरटे या दोन घटनांमधील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
चौकट.. २.
तिन्ही घटना सकाळी घडल्या
वाळूज महानगर, कांचनवाडी तसेच समर्थनगर येथील मंगळसूत्र चोरीच्या घटना सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान घडल्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला दागिने घालून बाहेर पडणार हे हेरुन चोरट्यांनी संधी साधलेली दिसली. पोलिसांना मात्र मंगळसूत्र चोरीच्या घटना घडतील याचा अंदाज आला नाही.
चौकट.. ३
समर्थनगरात मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्यांनी गतवर्षीही घातला धुमाकूळ
समर्थनगरात शिक्षक पत्नीच्या गळ्यातील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहून तो पोलिसांना गतवर्षीपासून वाँटेड असल्याचे समजले. या चोरट्यांनी २० जानेवारी २०२० रोजी समर्थनगर येथे एका शिक्षिकेचे तर ९ जुलै २०२० रोजी आणि यावर्षी २ जानेवारी रोजी सिटीचौक हद्दीत एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. ३० जानेवारी रोजी दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र शांतिनिकेतन कॉलनीतून हिसकावून नेले होते.