शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

एकीच्या कागदपत्रावर दुसरीला नोकरी, संस्थाचालकासह सात जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:06 PM

मुलाखतीसाठी आलेल्या एकीच्या कागदपत्रावर दुसरीचे छायाचित्र लावून तिला सेवेत घेऊन शिक्षण विभागाची तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : मुलाखतीसाठी आलेल्या एकीच्या कागदपत्रावर दुसरीचे छायाचित्र लावून तिला सेवेत घेऊन शिक्षण विभागाची तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.असगरी बेगम सय्यद मोहम्मद अली, नूरजहॉबेगम वलीओद्दीन, शेख मुबीन शेख शोएब, अख्तर खान हुसेन खान, शेख मोहसीन शेख शोएब, शेख नाजीमोद्दीन निहालोद्दीन, इम्रान खान फारुख खान यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सय्यद नजमा यांनी ३ मार्च रोजी जिन्सी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांचे शिक्षण एम.एस्सी.बी.एड.पर्यंत झालेले आहे. २००६ साली त्यांनी वर्तमानपत्रातील सहशिक्षकपदाची जाहिरात वाचून आरोपींच्या अलमोबीन शिक्षण संस्थेत मुलाखत दिली होती. त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा असगरी बेगम यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि शैक्षणिक कागदपत्र ठेवून घेतले होते. नोकरीसाठी निवड झाली अथवा नाही, हे नंतर कळविते असे त्यांनी सांगितले होते. मुलाखतीनंतर संस्थेकडून त्यांना बोलावणे आले नाही. नंतर त्यांनी मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेजमध्ये २००८ ते २०११ या कालावधीत काम केले. त्यानंतर त्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथील इंदिरा गांधी इंग्रजी शाळेवर २०१२ ते १३ दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकपदी कार्यरत होत्या. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत अंजुमन इंमदादूत तुलबा या संस्थेत मुख्याध्यापकपदी त्यांनी नोकरी केली. तेव्हापासून त्या घरीच होत्या.दरम्यान, पोलिसांकडून नजमा यांना समजले की, आरोपी संस्थाचालकाने त्यांच्या नावे दुसऱ्या महिलेचे छायाचित्र चिकटवून २००६ ते २०१२ या कालावधीत एका महिलेला शिक्षिका म्हणून संस्थेत नोकरीवर घेतले. त्यासाठी नजमा यांची शैक्षणिक कागदपत्रे जिल्हा परिषदेत सादर करून त्यांच्या नावाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडले. त्या खात्यात नजमा यांच्या नावे जमा झालेले वेतनाचे तब्बल १२ लाख रुपये त्यांनी परस्पर उचलून अपहार केला. हा प्रकार समजल्यानंतर नजमा यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालक आणि अन्य कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली. सहायक निरीक्षक साईनाथ गिते तपास करीत आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीEducation Sectorशिक्षण क्षेत्र