शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

वाळूच्या ट्रकने वृद्ध महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:00 AM

नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या महिलेला वाळूच्या भरधाव ट्रकने चिरडले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या महिलेला वाळूच्या भरधाव ट्रकने चिरडले. हा भीषण अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कोकणवाडीतील अहिल्यादेवी होळकर चौकात झाला.लालमती रामआशिष पासवान (५०, रा. उस्मानपुरा येथील गुरुद्वारामागे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा येथे देवीची यात्रा भरली आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस भाविक देवीच्या दर्शनाठी गर्दी करतात. विशेषत: भल्या पहाटे दर्शनासाठी पायी जाणा-या भाविकांची संख्या अधिक आहे. सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास लालमती पासवान या नातेवाईकांसह दर्शनासाठी पायी निघाल्या होत्या. कोकणवाडी चौकात रस्ता ओलांडत असतानाच एक वाहन वेगात येत असल्याचे पाहून त्या परत फिरल्या व वेगात आलेल्या ट्रकने (एमएच-०४-३३५१) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, लालमती यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि बेशुद्ध पडल्या. अपघाताची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या लालमती यांना तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले.अपघात विभागातील डॉक्टरांनी लालमती यांना तपासून मृत घोषित केले. वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रि या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मृत लालमती यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून शहरात स्थायिक आहे. त्यांचे पती बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.