तालुक्यातील गोदावरी नदीपात्राबरोबरच शिवना नदीपात्रातही वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. शिवना नदीपात्रात लासूरगाव शिवारात गट नंबर १२५, १३८ व १५२ मध्ये वाळू साठा आहे. या वाळूपट्ट्यांचा २२ ते २६ एप्रिलदरम्यान इ-टेंडरिंग करून लिलाव करण्यात आला. या लिलावात शिवप्रसाद अहिलाजी डमाळे यांच्या शिवप्रसाद ट्रेडिंग कंपनीने सर्वोच्च बोली लावून पाच हजार ३०० ब्रास वाळूसाठा जीएसटीसह ८७ लाखांत विकत घेतला. या बोलीचा १४ लाख ५० हजार रुपयांचा भरणाही त्यांनी शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. उर्वरित रक्कम भरणा करून त्यांनी वाळू उचल करायची होती. मात्र त्यांनी या वाळूपट्ट्यांची पाहणी केली. त्यावेळी या वाळूपट्ट्यांतून आठ ते नऊ फुटांपर्यंत खड्डे करून वाळू चोरी केल्याचे निदर्शनास आले. या पट्ट्यांतून हजारो ब्रास वाळू चोरी झाली आहे. त्यामुळे त्यांनी या वाळूपट्ट्यांची पुन्हा मोजणी करून पंचनामा करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. या वाळूपट्ट्यांची मोजणी केल्यास वाळू कमी ब्रास भरेल. ठेकेदाराने बोली लावलेली वाळू कमी भरल्यास रक्कम ही कमी होऊ शकते. त्यामुळे वाळू चोरीमुळे शासनाचा महसूल बुडणार आहे. या बुडालेल्या महसुलाला जबाबदार पोलीस की महसूल अधिकारी आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फोटो : शिवना नदीपात्रातून लासूरगाव शिवारातून वाळूमाफियांनी वाळू चोरून नेल्याचे दिसत आहे.
030521\img-20210428-wa0203_1.jpg
शिवना नदीपात्रातून लासुरगाव शिवारातून वाळुमापियांनी वाळू चोरुन नेल्याचे दिसत आहे.