औरंगाबाद : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी पाहणी करत घाटी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. याच दौऱ्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात त्यांनी आपले दंतोपचार घेतले. घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी अद्ययावत सुविधा मिळणे गरजेचे आहे. घाटीत पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी शुक्रवारी सांगितले.
या बैठकीस आमदार प्रदीप जैस्वाल, घाटी रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, डॉ.विजय कल्याणकर उपअधिष्ठाता डॉ.एम.एस.बेग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. येरेकर, डॉ.शेंडगे, महावितरणचे चिंचनकर यांची उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान भुमरे यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थितीचा देखील आढावा घेतला आढावा घेताना त्यांनी आपले दंतोपचार देखील घेतले. पालकमंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्याने सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.