सोयगाव : ग्रामीण भागातील महिलांना स्वस्तात सॅनिटरी पॅडची व्यवस्था व्हावी, यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून नांदगाव तांडा ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटरी पॅड मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे महिलांना केवळ दोन रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन समाजकल्याण सभापती मोनाली राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी गावासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धिकरण केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भूषण मगर, सरपंच अरुणाबाई पवार, उपसरपंच शेख अहमद, उखा चव्हाण, सावित्रीबाई चव्हाण, रेखाबाई पवार, पार्वताबाई पवार, गणेश माली, कैलास पवार, आबा काळुंखे, हनिग पठाण, दिलीप पद्मे, आदींची उपस्थिती होती.
फोटो : नांदगाव तांडा येथे ग्रामपंचायत कार्यालयात सॅनिटरी पॅड मशीनचे उद्घाटन करताना समाजकल्याण सभापती मोनाली राठोड.