संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज व सामाजिक विचार मंचचे संस्थापक गजानन नांदूरकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक भांगसीमाता गडावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी गडाचा परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात जि. प. सदस्या रेखा नांदूरकर, मंचचे अध्यक्ष केशव ढोले, संगीता पाटील, शालिनी ढोले, संध्या अग्रवाल, पद्मा भगत, रूपाली फलटणे, भारती शेवगावकर, लता माळे, अंकिता राऊत, मीनाक्षी माळी, सविता राऊत, रूपचंद अग्रवाल, प्रकाश भगत, रवींद्र शेलगावकर, व्यंकटी टेकाडे, दत्ता डोरले, चांगदेव जगताप, अमर निकम, बालाजी पांचाळ, चरण खराडे, उमेश राऊत, स्वप्नील माळी, ऋषिकेश पाटील, संजय फलटणे आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप माळी यांनी केले, तर आभार शिवाजी राऊत यांनी मानले.
फोटो ओळ- सामाजिक विचार मंचच्या वतीने भांगसीमाता गडावर वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
फोटो क्रमांक- अभियान
--------------------------------
सिडकोत सायकल रॅलीतून जनजागृती
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सह्याद्री वृक्ष बँक व सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने रविवारी सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली.
सिडको महानगर परिसरातील जवळपास २५० जणांनी एकत्रित घेऊन या सायकल रॅलीत सहभाग नोंदविला. शहरातील बाबा पेट्रोलपंप येथून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत सहभागी महिला, मुले, मुली, विद्यार्थी यांनी सायकलवर जनजागृतीचे फलक लावून पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. सिडको परिसरातील सारा गौरव, जलकुंभ परिसर आदी मार्गांवरून ही रॅली काढून सह्याद्री वृक्ष बँकेत या रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी सह्याद्री वृक्ष बँकेचे सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पर्यावरणप्रेमींसोबत संवाद साधला. यानंतर आ. अंबादास दानवे, सह्याद्री वृक्ष बँकेचे पोपटराव रसाळ, कृष्णा गुंड, अण्णा वैद्य, उपसरपंच विष्णू जाधव, नागेश कुठारे, काकासाहेब बुट्टे, रमाकांत अहिरे, गणेश थेटे, प्रकाश कदम, शैलेंद्र कोरे, जनार्दन सूर्यवंशी, शारदा कोथिंबिरी, रोहिणी काळे, मंजूषा महाजन आदींसह अनेकांनी दोन तास सह्याद्री वृक्ष बँकेत श्रमदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णुदास पाटील, संजय काळे, प्रदीप माळी, शिवाजी राऊत, रोहित चिकणे, देवदत्त कोकाटे, प्रणव रसाळ, भाऊसाहेब चव्हाण, प्रवेश पत्रा, नारायण सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ- सिडको वाळूज महानगरात सह्याद्री वृक्ष बँक व सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने सायकल रॅली काढून नागरिकांत जनजागृती करण्यात आली.
फोटो क्रमांक- रॅली
-----------------------