लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ४ कोटी रुपयांच्या कॅश क्रेडिट कर्जापोटी बँकेकडे तारण ठेवलेल्या भूखंडावर परस्पर इमारत उभी करून ग्राहकांना त्यातील फ्लॅट विक्री करून बिल्डर संजय कासलीवाल याने चक्क बँकेलाच गंडविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला असून, कासलीवाल यास अटक करण्यात आली आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी सांगितले की, मलकापूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या गुलमंडी शाखेचे व्यवस्थापक संजय फिरके यांनी याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले आहे. बिल्डर कासलीवाल यांनी तक्रारदारांच्या बँकेकडून २०१२-१३ मध्ये ४ कोटी रुपये कर्ज घेतले होते. यावेळी त्याने साताºयातील गट नंबर ७४ मधील भाग अ मधील प्लॉट नंबर १ आणि १६ तारण म्हणून बँकेला दिले होते. कासलीवालने मुदतीत कर्जफेड न केल्याने बँकेने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू केली. ही बाब समजताच त्याने बँकेविरुद्ध ऋण वसुली प्राधिकरणात दावा दाखल केला. या दाव्याची नोटीस तक्रारदारांना प्राप्त झाल्यांनतर तक्रारदार न्यायालयात हजर झाले. तेव्हा कासलीवाल याने दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रात बँकेकडे तारण असलेल्या भूखंडाचा उल्लेखच नसल्याचे समजले.बनावट कागदपत्रांद्वारे ले-आऊटआरोपी कासलीवाल याने बँकेची फसवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला. त्यानुसार त्याने जुन्या रेखांकनानुसार बँकेला तारण दिलेल्या भूखंडावर दुसरेच ले-आऊट (रेखांकन) मनपा नगररचना विभागाकडून मंजूर करून घेतले. बँकेकडे तारण असलेल्या भूखंडावर त्यांनी इमारत बांधून त्यातील सदनिका वेगवेगळ्या ग्राहकांना विक्री केल्याचे समोर आले. हे करण्यासाठी कासलीवाल याने संबंधित कार्यालयात खोटे व बनावट दस्त सादर करून तसेच रेखांकनामध्ये फेरफार करून भूखंड क्रमांक १ चे संपूर्ण क्षेत्रफळ इतर फर्ममध्ये दशविले. कासलीवालविरुद्ध यापूर्वी क्रांंतीचौक पोलीस ठाण्यात ८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, कर्मचारी दादासाहेब झारगड, प्रकाश काळे, विलास कुलकर्णी, सुनील फेपाळे, यांच्या पथकाने चिंतामणी कॉलनीतील घरातून आरोपीला उचलले.