छत्रपती संभाजीनगर : संजयनगर -मुकुंदवाडी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमुळे कष्टकरी, मजुरांची वसाहत म्हणून उदयास आली. पालकांनी काबाडकष्ट करून मुलांना शैक्षणिक संस्कार, बौद्धविहारांतील आचरणातून घडवले. बहुतांश युवकांनी आपणही शिक्षणातून मोठे होऊ, हे स्वप्न ठेवून वाटचाल केली. त्याचा परिपाक म्हणून आता वसाहतीत उद्योजक, डॉक्टर, वकील, पोलिस घडताहेत.
वसाहतीत हळूहळू उद्योजकतेची लाट आली. त्यातून विकास होत आहे. व्यसनाधीनता सोडली पाहिजे, घराचे स्वप्र साकार व्हावे अशा निर्धारातून वसाहत पुढे जात आहे.
वसाहतीत विकासकामाला हातभारजलवाहिनी, पाण्याची टाकी, रस्ते बांधकाम, आरोग्य केंद्रासाठी प्रयत्न करणारे कारभारी सुभाष परदेशी, बन्सीलाल गांगवे, लीलावती घाईतिलक, बाळूलाल गुर्जर, सरिता ससाणे, सुनीता चव्हाण यांनी वॉर्डाच्या विकासकामांसाठी निधी येथे खर्च केलेला आहे.
मजुरांची मुले संस्कारक्षमएकेकाळी राबराब राबूनही पोटभर जेवण मिळेल, याची खात्री नव्हती. परंतु अख्खे कुटुंब राबल्याने प्रत्येक कुटुंबात एकजण तरी चांगल्या हुद्यावर आहे. स्वयंरोजगार उभा करून अनेकांच्या हाताला काम देण्याचे काम केले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या निधीतून समाजमंदिर, हातपंप इ. कामे करून घेता आली.- अशोक डोळस
पोलिसांनी लक्ष ठेवून धडा शिकविला पाहिजेमुलांनी व्यसनापासून अलिप्त राहिले पाहिजे. पालकांनी व पोलिसांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. विकसित होत असलेल्या संजयनगराचे नाव अधिक कसे उंचावेल, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.- विश्वंभर भालेराव
ट्रान्सफाॅर्मरला झाडेवेलींचा विळखारस्त्यालगत तसेच विहाराच्या बाजूला असलेल्या डीपीला झाडेवेलींनी विळखा घातला आहे. याविषयी अधिकाऱ्यांना कळवूनही अनेकदा कानाडोळा केला आहे.- अक्षय नावकर
सिमेंटच्या रस्त्यावर चिखल..नवीन ड्रेनेजलाइन टाकल्यानंतर त्याची डागडुजी केलेली नाही. त्यामुळे काही गल्ल्यांमध्ये चिखल होत आहे.- अशोक भातपुडे
मोकाट कुत्र्यांचा त्रासमोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यांचा बंदोबस्त मनपाने करायला हवा. लहान मुलांना व नागरिकांना हे कुत्रे चावा घेण्याची भीती आहे.- किरण दाभाडे
औषधफवारणी करासंजयनगर परिसरात दररोज सफाई झाली पाहिजे. डासांचा त्रास वाढल्याने औषधफवारणीची गरज आहे. डेंग्यू तसेच थंडीतापाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत.- श्रीकांत रणभरे