तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील राहत्या घराला दुपारी अडीच वाजता अचानक आग लागली. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तामलवाडी येथील लक्ष्मण सुग्रीव गायकवाड यांच्या घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत अख्खे घर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड, गोपाळ गायकवाड, शिवदास पाटील, महेश गायकवाड, रामदास गायकवाड, संतोष घोटकर, उमेश गायकवाड, शुभम पाटील, अंबादास गायकवाड यांनी घटनास्थळाकडे धाव घेवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमध्ये घरातील कपडे, अन्नधान्य, टीव्ही, भांडी, सोने-चांदीचे दागिने यासह रोख ८० ते ९० हजार रुपये असे एकूण सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणी तामलवाडी ठाण्यात आकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास किरण थिटे हे करीत आहेत. दरम्यान, सदरील कुटुंबास शासनाच्या वतीने तातडीने नुसाकन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)
संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By admin | Published: April 01, 2016 12:49 AM