चितेगाव : आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने गेवराई व गिरनेरा तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून दुचाकी रॅलीही काढण्यात आली.
सर्वप्रथम जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त तपस्वी अप्पा महाराज यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य रमेश गायकवाड, मुख्याध्यापक पी.एम.पवार उपस्थित होते. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विलास पवार यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. गिरनेरा तांडा - गेवराई तांडा - क्रांती चौक मार्गे - टि.व्ही. सेंटर - वसंतराव नाईक चौक - जय भवानी नगर ते नाईक नगर येथे रँलीचा समारोप करण्यात आला.
त्यानंतर सभा घेण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष राजपालसिंह राठोड व प्रवक्ता डॉ कृष्णा राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांनी मानवी मूल्याची जोपासना करण्यासाठी संत साहित्यातून समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विचार आजही समाजाला पोषक आहे त्यासाठी समाजाला एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय जाधव, लहु राठोड, बंडु राठोड, बंटी पवार, दत्तू चव्हाण, प्रकाश राठोड, सुरेश राठोड , गणेश जाधव, बाळा आडे, हिरालाल पवार, निलेश चव्हाण, प्रकाश जाधव, रवी चव्हाण, सुभाष चव्हाण, संतोष राठोड, रमेश पवार, साजन जाधव,अमोल चव्हाण, बब्बू चव्हाण, युवराज चव्हाण, रमेश राठोड आदींनी परिश्रम घेतले.