यंदा कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने संत सेवालाल यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमराव राठोड तर प्रमूख पाहुणे म्हणून नारायण पवार, भानुदास राठोड, गोरख राठोड, शांतीलाल राठोड, कोमलसिंग जाधव, गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
सोमवारी सकाळी होम हवन, पुजा आदी कार्यक्रम घेण्यात आले. यानंतर दुपारी बाल ब्रह्मचारी साहेबराव शास्त्री महाराज आळंदी यांनी प्रवचनातून भाविकात समाज प्रबोधन केले. संत सेवालाल महाराज यांनी संत साहित्यातुन आदर्श समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न करुन समाजाला दिशा देण्याचे काम केल्याचे साहेबराव शास्त्री महाराज यांनी सांगितले. संत सेवालाल यांची शिकवण समाजासाठी प्रेरणादायक असून प्रत्येकाने त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवचनानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, सिडको वाळूजमहानगर आदी भागातील बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ
बंजारा समाजातर्फे संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त बजाजनगरातील संत सेवालाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.