शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

संतपीठाची इमारत निवडणुकीसाठी अधिग्रहित; विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे?

By विजय सरवदे | Published: November 01, 2023 3:55 PM

विद्यापीठ प्रशासन संभ्रमात : पैठण तहसीलदारांनी इमारत अधिग्रहित केल्याची बजावली नोटीस

छत्रपती संभाजीनगर : ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पैठण येथील संतपीठाच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संतपीठाच्या इमारतीसह परिसर अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतपीठात पाच अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या १२५ विद्यार्थ्यांना कोठे शिकवायचे, असा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशासनासमोर आहे.

१९९० च्या दशकापासून संतपीठाचे भिजत घोंगडे पडलेले होते. संतपीठासाठी पैठणजवळ एक इमारतही बांधण्यात आली. मात्र, संतपीठाचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार, यावरून अनेक वर्षांपासून संतपीठ सुरू होऊ शकले नव्हते. १७ सप्टेंबर २०२१ रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने संतपीठाचा श्रीगणेशा केला. संतपीठाचे संचलन करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर सोपवली. त्यानुसार विद्यापीठाने संतपीठात पाच अभ्यासक्रम सुरू केले. त्या अभ्यासक्रमांना १२५ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हॉलसह क्लासरूम बनविल्या. त्यात विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे धडे गिरवत आहेत. असे असतानाच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी २०१९ मधील लोकसभा व विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या संतपीठात निवडणूक विभागाची स्ट्राँग रूम, निवडणूक साहित्य वाटप व स्वीकृती, प्रशिक्षण घेणे, मतमोजणी, जेवणाची सुविधा व पार्किंगसाठी संतपीठाची इमारत आणि जागा परिसर अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. पैठणच्या तहसीलदारांनी त्याविषयीचे पत्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना पाठविले आहे.

वर्ग कुठे भरवणार?संतपीठाची इमारत २०१९ साली निवडणूक कामासाठी वापरली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी इमारत अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. मात्र, २०१९ ला संतपीठ सुरू झाले नव्हते. २०२१ साली ते सुरू झाले आहे. पाच अभ्यासक्रम शिकविले जातात. ते शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. ते कोठे नेऊन वर्ग भरवावेत, असा प्रश्न संतपीठ प्रशासनाला पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुलगुरूंच्या आदेशानुसार पुढील कार्यवाहीसंतपीठाची इमारत व परिसर अधिग्रहित करण्याचे आदेश आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या अडचणी निवडणूक विभागाला कळविण्यात येतील.कुलगुरूंच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.-डॉ. भगवान साखळे, कुलसचिव

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद