शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

सरपंच हा कर्णधार,चांगला असेल तर विकास : नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:03 AM

सरपंच हा गावचा कर्णधार असतो. तो चांगला असेल, लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा असेल, तर त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन आज लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरपंच हा गावचा कर्णधार असतो. तो चांगला असेल, लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा असेल, तर त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन आज लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.अत्यंत उत्साही वातावरणात हा सोहळा लोकमतच्या लॉनवर दुपारी संपन्न झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांची त्यांच्या टीमसह या सोहळ्यास मोठी उपस्थिती होती. अनेक ग्रामसेवकही उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातील रोहयो उपायुक्त पारस बोथरा यांची प्रमुख उपस्थिती होती.ग्रामविकासाचा नवा पॅटर्न राबवून गावाला समृद्ध संपन्न करणाºया जिल्ह्यातील तेरा गावकारभाºयांचा हा अवॉर्ड सोहळा अविस्मरणीय ठरला. तुतारीच्या निनादात, मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि कौतुकाच्या वर्षावात डोक्यावर फेटा बांधून सरपंचांनी सुहास्य वदनाने हे अवॉर्ड स्वीकारले.बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्डचे प्रायोजक पतंजली आयुर्वेद असून, महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. अप्पासाहेब उगले आणि आनंद असोलेकर या परीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार खालीलप्रमाणे हे पुरस्कार वितरित करण्यात आले.१) जलव्यवस्थापन : गोळेगाव, ता. खुलताबादचे सरपंच संतोष बाळकृष्ण जोशी.२) वीज व्यवस्थापन : हस्ता, ता. कन्नडचे सरपंच मनोहर नीळ३) शैक्षणिक सुविधा : पोखरी, ता. औरंगाबादचे सरपंच अमोल काकडे४) स्वच्छता व्यवस्थापन : गणोरी, ता. फुलंब्रीच्या सरपंच पद्माबाई जाधव.५) पायाभूत सुविधा : गणेशवाडी, ता. गंगापूरचे सरपंच अनिता ज्ञानेश्वर निरफळ६) सुरक्षा : वळदगाव, ता. औरंगाबादचे सरपंच राजेंद्र घोडके.७)आरोग्य : पाटोदा, ता. औरंगाबादचे सरपंच भास्कर पेरे.८) कृषी व्यवस्थापन : हस्ता, ता. कन्नडचे सरपंच मनोहर नीळ.९) आधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थापन : पालखेड, ता. वैजापूरचे सरपंच वर्षा जाधव.१०) पर्यावरण व्यवस्थापन : कायगाव, ता. सिल्लोडचे सरपंच सारंगधर सुखदेव जयवळ.११) रोजगार निर्मिती : कुंभेफळ, ता. औरंगाबादच्या सरपंच कांताबाई सुधीर मुळे.१२) उदयोन्मुख नेतृत्व : अंमळनेर, ता. गंगापूरचे सुमित रामेश्वर मुंदडा.१३ ) बीकेटी प्रस्तुत लोकमत सरपंच आॅफ द इयर: वांगी बुद्रुक, ता. सिल्लोडचे महेश भाऊराव पाटील.प्रारंभी, लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रास्ताविक केले.‘गावे कात टाकताहेत, विकासाच्या दिशेने झेपावताहेत. विकासाची ज्योत एकमेकांनीच पेटवायची असते आणि कोणत्या गावाने काय व कोणता विकास केला, हे कळावे म्हणून हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे, हे महाजन यांनी नमूद केले.बीकेटी टायर्सच्या औरंगाबाद प्लँटचे सहव्यवस्थापक के. व्यंकटरमण यांनी बीकेटी टायर्सच्या प्रगतीचा लेखाजोखा यावेळी मांडला व सबका साथ सबका विकास हे आमचे ब्रीद असल्याचे सांगितले, तर महिंद्रा ट्रॅक्टर्सचे सचिन नवले यांनी महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या उत्पादनांची माहिती दिली. यावेळी पतंजलीची चित्रफीत दाखवण्यात आली. बीकेटीचे वरिष्ठ डीजीएम यशवंत विधाते, प्रॉडक्शनचे जीएम अजय गुप्ता, एचआर हेड मंगेश देशपांडे,महाराष्टÑ बियाणे उत्पादक संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, महिंद्रा ट्रॅक्टरचे डीलर मंगलसिंग पवार, सिनियर मॅनेजर एच आर डॉ. उद्धव वाघमारे, नेत्रानंद अंबडकर आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, लोकमत टाईम्सचे निवासी संपादक योगेश गोले आदींची मंचावर उपस्थिती होती. नीता पानसरे व ग्रामीण विभागप्रमुख उदयकुमार जैन यांनी सूत्रसंचालन केले.याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या वार्ताहरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापती ताराबाई उकीर्डे, ज्योती काकडे- पठाडे, फुलंब्री पं. स. सभापती सर्जेराव मेटे, राजाराम पाडळे, श्रीरंग पा. साळवे, आदींसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामविकासाचे मंथन आवश्यकच...यावेळी बोलताना रोहयो उपायुक्त पारस बोथरा यांनी सांगितले की, ग्रामविकासाचे मंथन आवश्यकच आहे. ही काळाची गरज आहे. ग्रामविकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची राहत आली आहे. कारण सरपंचाला कार्यकारी अधिकार आहेत. कॉर्पोरेट सेक्टरला सीएसआरची कामे कुठे करायची हे अनेकदा समजत नाही.आॅडिटवर सरपंचांचे लक्ष असणे गरजेचे आहे. मागे काय चुका झाल्या हे यातून कळते. तसेच इन्स्पेक्शन रिपोर्ट हा विकास कामांचा आरसा आहे. कलम ३९ मध्ये कर्तव्यात कसूर असा शब्द आला आहे. १४ व्या वित्त आयोगानुसार आराखडे तयार झाले; पण त्यात भौतिक सुविधा आवश्यक असल्या तरी मानवी विकास निर्देशांकाचे घटकही आवश्यक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.बीकेटीची १३० देशांमध्ये निर्यात...व्यंकटरमण यांनी सांगितले की, बीकेटी टायर्स सध्या १३० देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करीत आहे. बीकेटीची पहिली फॅक्टरी औरंगाबादला सुरूझाली. आता देशभर जागोजागी विस्तार झाला आहे. औरंगाबादला आणखी मोठा विस्तार होत आहे. सीएसआर उपक्रमांत बीकेटी अग्रेसर आहे. ३८ जिल्ह्यांमध्ये आम्ही टँकरने पाणी पुरवितो.महिंद्राची जमीन, समुद्र आणि आकाशात झेप४महिंद्रा ट्रॅक्टर्सची माहिती सचिन नवले यांनी दिली. महिंद्रा आता जमीन, समुद्र आणि अवकाशातही झेपावत आहे. विमानेही बनविणार आहे. २००९ पासून महिंद्रा ट्रॅक्टर्स उत्पादनात अग्रेसर आहे.सरपंचाच्या खुर्चीत सावित्रीबाई फुले यांचा फोटो, संविधान आणि ग्रामगीतागोळेगावचे सरपंच संतोष जोशी यांनी सत्कारमूर्तींतर्फे मनोगत व्यक्त केले. ‘२००५ पासून मी गोळेगावचा सरपंच आहे; पण मी कधीही सरपंचाच्या खुर्चीवर बसलो नाही. त्या खुर्चीवर सावित्रीबाई फुले यांचा फोटो, संविधान आणि ग्रामगीता ठेवण्यात आलेली आहे’ असे जोशी यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मी कधी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, होऊ दिला नाही. सरपंचपदाचे मानधनही कधी घेत नाही (टाळ्या) हा पुरस्कार मी गोळेगावच्या गावकºयांना समर्पित करीत आहे. केवळ ४५ दिवसांत जलव्यवस्थापन होऊ शकते, हे जोशी यांनी ठासून सांगितले.‘शेतकरी आत्महत्यांवरही व्हावी ग्रामसभेत चर्चा’जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी विविध मुद्यांची चर्चा केली. ग्रामीण भागात आजही एकमेकांशी चांगला संपर्क असतो. शहरात तो बघायला मिळत नाही. शेतकरी आत्महत्या आणि महिलांचा लैंगिक छळ यासारख्या विषयांची चर्चा ग्रामसभांमध्ये व्हायला हवी. प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक दृष्टिकोन बनत जातो, तेव्हा आत्महत्येचा विचार मनात घोळायला लागतो. शेतकºयांच्या आत्महत्या आजही होताहेत. या गंभीर विषयांवर ग्रामसभांमध्ये चर्चा व्हावी. अनेक गावांमध्ये ग्रामसभाच होत नाहीत. त्या आवर्जून झाल्या पाहिजेत. भांडणे होतात म्हणून ग्रामसभा टाळणे योग्य नाही. एकदा-दोनदा भांडणे होतील; पण ग्रामसभा झाल्या पाहिजेत, असा सल्ला राम यांनी दिला.४त्यांनी सांगितले की, ९० टक्के गावांमध्ये वीज बिले थकित असतात. संग्राम केंद्रेही बंद अवस्थेतच आहेत. ४० टक्के महिला सरपंच पुढे येत नाहीत. त्यांच्याऐवजी सरपंच पतीच येतात. सरपंच पती व जिल्हा परिषद सदस्य पती असे शब्द कमी झाले पाहिजेत.४समन्वय, प्रेम व एकोप्याने विकास होत असतो. चांगली व नवीन संस्कृती गावात निर्माण करता येऊ शकते. ३० टक्के सरपंच प्रामाणिकपणे काम करीत असतात. ग्रामेसवक सरपंचांना अंधारात ठेवणार नाहीत, याची काळजी जिल्हा परिषदांनी घेतली पाहिजे. सरपंचांसाठी माझे दरवाजे चोवीस तास खुले आहेत. आपण संपर्क साधून आपल्या गावाचे प्रश्न मांडू शकता. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. आताच जिल्ह्यात १५० टँकर्स चालू आहेत, याची जाणीव जिल्हाधिकाºयांनी यावेळी करून दिली.