औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.स्थानिक जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व पाणीपुरवठा विभागाच्या टीमने गांधेली तलाव तसेच परदडी धरणावरून पाणी लिफ्टिंग करून आणण्यासाठी पाहणीदेखील केली होती; परंतु त्या योजनेला पुढे अचानक विराम आला. नगर परिषदेच्या दरम्यान मनपाच्या जलवाहिनीवरून नक्षत्रवाडी पॉइंटवरून मोफत टँकरने देवळाई-साताºयातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला. सातारा देवळाईत सार्वजनिक विहिरीवर दर दोन दिवसाआड २४ हजार लिटरचे मोफत पाणी टाकण्यात येत आहे, इतर नागरिकांना १८ ड्रमच्या हिशेबाने पाच हजार लिटरचे टँकर खरेदी करावे लागत आहे. आगाऊ पैसे भरूनही टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. गल्लीबोळात छोटे टँकर पाठविण्याच्या मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी सातारा-देवळाईतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून रांगेत थांबून पाण्याची कॅन, हंडे वाहून आणावेच लागतात.२४ हजार ७०० मालमत्ताधारकांना कर वसुलीसाठी मनपाने नोटिसा पाठविण्याचे काम सुरूच असून, अर्ध्याच्यावर नोटिसा पोहोचल्या आहेत. नागरिक कर भरण्यास स्वत:हून तयार आहेत; परंतु सेवासुविधांचे काय असाच सवाल नागरिकांसमोर कायम आहे.कागदी घोडे सुरूचसातारा, देवळाई मुख्य बायपासवरून एमआयडीसीची जलवाहिनी गेली असून, लगतच्या काही कॉलन्यात पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनाला यश आले होते. मनपा म्हणते नाहरकत प्रमाणपत्र एमआयडीसीला सादर केले, तर एमआयडीसीचे अधिकारी म्हणतात अद्याप त्यास मंजुरी आली नाही. नागरिकांनी आंदोलनातून शंभरीच गाठली; परंतु पाणी देण्याऐवजी तोंडाला सतत पाने पुसली जात आहेत. - प्रा. प्रशांत अवचरमलपाण्यासाठी रस्त्यावर उतरणारमनपाकडून सातारा, देवळाई दोन्ही वसाहतीला मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. चाकोरीत चालणाºया शासकीय, निमशासकीय,अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरत नाही, याचा गैरफायदा मनपा घेत आहे. परिणामी कुटुंबाचे आर्थिक बजेट बिघडत आहे.-सामाजिक कार्यकर्त्या पंकजा माने
सातारा-देवळाईत दूध, साखरेसह सकाळी घ्यावा लागतो पाण्याचा जार ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:48 PM
सातारा-देवळाई परिसरात पाऊण लाखापेक्षा अधिक लोकसंख्येला बाराही महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जनतेला हातातील सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दूध, साखर,नाश्त्याचे साहित्य खरेदीसह पाण्याचा जारही घ्यावा लागत आहे. ही नवीन पद्धत सातारा-देवळाई परिसरात रूढ झाली आहे.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे मौन : जार व टँकर खरेदीचा दरमहिन्याला सहन करावा लागतो भार