तालुक्यातील दिडगाव-उपळी शिवारातील अंजना नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामास सुरुवात झाली. सावखेडा चारणा नदीवरील सुरू असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. शनिवारी सकाळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाहणीदरम्यान जि.प. चे माजी उपाध्यक्ष केशव तायडे, डॉ. संजय जामकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, जलसंधारण अधिकारी आर. पी. दांडगे यांची उपस्थिती होती.
३६ सिमेंट बंधारा कामांना मंजुरी
सिल्लोड व सोयगाव तालुक्यात जलसंधारण विभागांतर्गत जवळपास ३६ सिमेंट बंधाऱ्याच्या कामासाठी मंजुरी मिळालेली आहे. येत्या चार दिवसात ही कामे सुरू होतील. शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरील कामे शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही सत्तार यांनी केले.
220521\img-20210522-wa0357.jpg
सिल्लोड तालुक्यातील चारणा नदीवरील काम करताना