अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करावे, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने शासनास केलेल्या ६८ शिफारशी संदर्भातील शासन निर्णय तत्काळ पारित करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचे भांडवल द्यावे, शेंद्रा येथील श्री मांगीरबाबा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, श्री मांगीरबाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करावे, मातंग भूमिहिनांच्या नावे सातबारे उतारे करावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात लहू प्रहारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, लहुजी सैनिक संघाचे अध्यक्ष रतन शेलार, लहू प्रहारचे कार्याध्यक्ष नितीन आव्हाड, महासचिव कचरू कांबळे, संपर्क प्रमुख काकासाहेब नाडे, राज्य प्रवक्ता मुकेश जाधव, युवा नेते उद्धव गायकवाड, सचिन भालेराव, प्रभाकर सरोदे, सदानंद आरसूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
लहू प्रहारच्यावतीने शाहू पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:04 AM