औरंगाबाद : राज्यव्यापी आंदोलनांतर्गत औरंगाबादेत जिल्हाकाँग्रेसतर्फे भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले.
जलदगती न्यायालयात खटला चालवून पिडितेला न्याय देण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तणूक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात झाली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे,माजी आमदार सुभाष झांबड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, माजी आमदार एम. एम. शेख, नामदेव पवार, डॉ. जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र काळे, सुरेखा पानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.