उदगीरात महाविकास आघाडीचा सत्याग्रह; केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

By हरी मोकाशे | Published: March 31, 2023 04:17 PM2023-03-31T16:17:25+5:302023-03-31T16:18:05+5:30

केंद्र सरकार विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी कायद्याचा गैरवापर करीत आहे.

Satyagraha of Mahavikas Aghadi in Udgira; Slogans against the central government | उदगीरात महाविकास आघाडीचा सत्याग्रह; केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

उदगीरात महाविकास आघाडीचा सत्याग्रह; केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

googlenewsNext

उदगीर : केंद्र सरकार मागील काही वर्षांपासून दडपशाहीचा वापर करुन हुकुमशाही पध्दतीने राज्य कारभार करीत आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी सत्याग्रह करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकार विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी कायद्याचा गैरवापर करीत आहे. त्याचा प्रत्यय परवा दिसून आला. काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणात जाहीररित्या प्रश्न विचारल्याने त्यांना सभागृहाबाहेर बाहेर काढण्यात आले. देशाच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारीच सभागृह बंद पडत होते. जनतेचे हक्क अबाधित राहावे म्हणून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आगामी काळात अशीच तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादीचे बसवराज पाटील नागराळकर, रंगा राचुरे, शिवकुमार हसरगुंडे, कल्याण पाटील, सिध्देश्वर पाटील, रामराव बिरादार, विजय निटुरे, समीर शेख, भरत चामले, प्रवीण भोळे, अब्दुल समद शेख, व्यंकटराव पाटील, प्रा. रामकिशन सोनकांबळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Satyagraha of Mahavikas Aghadi in Udgira; Slogans against the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.