करमाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी कारमधून सव्वा लाखाची रोकड जप्त केली.
जालनाकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारची (एम.एच.३०-ए झेड.४६६४) मंगळवारी दुपारी १ वाजता पोलिसांनी तपासणी केली असता एका बॅगमध्ये १ लाख ३० हजार ८००रुपये मिळून आले. या रकमेबाबत व्यापारी नितीन लोकचंद विधानी व चालक नितीन शंकर गायकवाड यांना रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी ती रक्कम जप्त केली.