शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

सायाळच्या कारनाम्याने कारखान्यास लाखोंचे नुकसान; काटयांवरुन शोध लागला, वनात केले मुक्त

By साहेबराव हिवराळे | Published: November 17, 2023 6:58 PM

शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीस बसला लाखोंचा फटका

छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इंटरनेट केबल तोडून लाखों रुपयांचे नुकसान करणारे सायाळ प्राणीमित्राच्या टिमने शोधून काढले. त्यानंतर त्याला वनक्षेत्रात सोडून जीवनदान देण्यात आले.

वनस्पतींचे कोंब, कंदमुळ, फळे, पालेभाज्या खाणारा सायाळ क्वचितप्रसंगी मांसाहार पण करताना दिसून आले आहे. परंतु, याच सायाळमुळे शेंद्रा येथील एका कंपनीस लाखोंचे नुकसान झाले आहे. झाले असे की, या कंपनीतील इंटरनेट अचानक ठप्प झाले. शोध घेतला असता वायर कुरतरडलेल्या ठिकाणी कर्मचारी अब्रार अहमद कुरेशी यांना सायाळचे काटे आढळून आले. याची माहिती प्राणी मित्र नितीन जाधव यांना देण्यात आली. त्यांनी कंपनीत येत शोध घेऊन सायाळ ताब्यात घेतले. त्यानंतर मानद वन्यजीवरक्षक डाॅ.किशोर पाठक आणि वनरक्षक अशोक भिमराव साबळे यांच्या समक्ष सायाळला सुरक्षित वनक्षेत्राच्या आधिवासात सायाळला सोडून देण्यात आले.

अधिवास नष्ट झाल्याने वन्यजीव धोक्यातवाढते औद्योगिकरण,मोठे महामार्ग निर्मिती,डोंगर-दऱ्या पोखरण, माळरान नष्ट होऊन मानवी हस्तक्षेप वाढल्याने अनेक प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अधिवास नष्ट झाल्याने संख्या कमी झाली असून अन्न शोधण्यासाठी हे प्राणी मानवी वस्त्या,कारखाने येथे दिसून येतात, अशी माहिती मानद वन्य जीवरक्षक डॉ.किशोर पाठक यांनी दिली.

सायाळचे वैशिष्ट्यसाळिंदर किंवा सायाळ याला इंग्रजीत पोर्कुपाईन असे म्हणतात. हा भारतात समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय परिसरात दिसणारा सस्तन प्राणी आहे. शेतजमिनी,वने,डोंगराळ,खडकाळ प्रदेशात सर्वत्र आढळतो.सायाळ हा कृतकजन्य म्हणजेच घुशीच्या कुळातला प्राणी आहे. याचे दात, पायाचे पंजे आणि नखे हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. जेणे करून या प्राण्याला जमीन खोदता येते तसेच कुरतडता येते. जमिनीत बिळ करून साळिंदर त्यात राहतो. तपकिरी काळसर रंग असून पाठीवरचे केस हे कडक होवून काट्यासारखे दिसतात. हे ३० सेमीपर्यंत वाढतात.शत्रूपासून बचाव करण्यासाठी हे काटे वापरात येतात.सायाळ शत्रू अंगावर आल्यास त्याच्याकडे पाठ करून काटे फुलावतो. त्यामुळे काटे शत्रूच्या शरीरात घुसतात, अशा रीतीने तो स्वतःचा बचाव करतो.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforest departmentवनविभागShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी