शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

डाक विभागात स्कॅम, सहकाऱ्याचा आयडी वापरुन सहायकाने खातेदाराचे ५ लाख केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:08 PM

सहकाऱ्याचे आयडी पासवार्ड वापरून घोटाळा केल्याचे चौकशीत झाले उघड

छत्रपती संभाजीनगर : सहकाऱ्याच्या आयडी पासवर्डचा गैरवापर करून डाक विभागाच्या सहायकाने एका ठेवीदाराच्या बँक खात्यातून ५ लाख ५८ हजार ४०० रुपये लंपास करून घोटाळा केला. गजानन प्रकाश शिराळ असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाक निरीक्षक शिवलिंग जायेवार यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. एप्रिल २०२३ मध्ये ठेवीदार स्मिता भोकरे यांनी २०२० मध्ये शहागंज शाखेत बचत खाते उघडले होते. आरोपी शिराळने डाक सहायक पदावर असताना त्यांचे ते खाते चुकीच्या पद्धतीने बंद केले. विभागीय चौकशीत सब पोस्ट मास्टर प्रकाश अहिरे यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरचा आयडी पासवर्डचा शिराळने परस्पर वापर केला. त्याद्वारे त्याने भोकरे यांच्या खात्यातील मोबाइल क्रमांकात बदल करून दुसरा मोबाइल क्रमांकाची नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या शाखेत बदली होताच त्याने सर्व रक्कम काढून घेतली.

चौकशीत शिराळ दोषीभोकरे यांनी तक्रार केल्यानंतर सहायक अधीक्षक एम.एस. वांगे व जायेवार यांनी चौकशी केली. त्यात शिराळ दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना सदर रक्कम जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याचेही पालन केले नाही. डाक विभागाला भाेकरे यांना व्याजासह ५ लाख ७१ हजार ५४७ रुपये अदा करावे लागले. त्यानंतर शिराळवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक निवृत्त गायके अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी