शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बीड, लातूरमध्ये सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत घोटाळा- संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 3:45 PM

बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद- बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. रेशनची धान्य वाहतूक करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने प्रशासनाला दिलेल्या चारचाकी वाहनांच्या यादीत काही दुचाकींचे नंबर असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे दोन्ही जिल्ह्याचा एकच ठेकेदार असून ठेकेदाराने  बीड आणि लातुर जिल्ह्या प्रशासनाला एक समान वाहनांची यादी दिल्याने एक वाहने दोन जिल्ह्यात कशी अन्न-धान्याची वाहतुक कशी करू शकतात,असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी उपस्थित केला.याविषयी डॉ. भानुसे म्हणाले की, आम्ही राज्यभरातील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा निर्णय घेतला. यांतर्गत राज्यातील सर्वच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधात माहिती कायद्यांतर्गत माहिती मागविली आहे. बीड आणि लातुर जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या दोन्ही जिल्ह्यातील रेशनच्या धान्याचा वाहतूक करणारा एकच ठेकेदार असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा ठेका घेताना ठेकेदाराने प्रशासनाला सादर केलेल्या त्याच्याकडील चारचाकी मालवाहु वाहनांशी शहानिशा न करता त्यास कंत्राट देण्यात आले. त्याने दिलेल्या वाहनांच्या यादीतील  एमएच-१६ एएस ८६७४, एमएच-१६ एएस ७२६४ या क्रमांकाच्या दुचाकी असल्याचे समोर आले. शिवाय दोन्ही जिल्ह्यात एकाचवेळी एमएच-२९एम ३५५५, एमएच-२३-७१३७, एमएच-१२डीटी ९४८१, एमएच१२एचडी २९५७, एमएच-२६एडी ०६०२, एमएच-३८डी ९३३३, एमएच-१३एक्स २४६८ ही वाहने कार्यरत असल्याचे दिसतात. हे सर्व संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाहतुक ठेकेदार आणि भांडारपाल यांच्या संगनमताने सुरू असल्याचे त्यांनी सांगतले. बीड आणि लातुर जिल्ह्यातील ६०टक्के लोक उसतोडणीसाठी बाहेरगावी स्थलांतरीत झालेले आहेत, असे असताना त्यांच्या नावे येणारे धान्य परस्पर ठेकेदार व अधिकारी संगनमताने काळ्याबाजारात विक्री करीत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी  जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाहतुक ठेकेदार आणि भांडारपाल यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे,अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांना दिल्याचे डॉ.भानुसे यांनी सांगितले.  यापत्रकार परिषदेलारमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, राजेंद्र पाटील, मोहिनी भानुसे आदी उपस्थित होते.