नजीर शेख ,औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खाजगी एजन्सीमार्फत करण्यात आलेल्या सुरक्षारक्षक भरतीमध्ये किमान वेतन कायद्याच्या भंगासह विविध घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. वार्षिक सुमारे सव्वादोन कोटी रुपये रकमेच्या सुरक्षारक्षक पुरविण्याच्या कंत्राटामध्ये करण्यात आलेल्या अनेक चुकीच्या बाबी समोर आल्या आहेत. ‘एसएमके’ ग्लोबल सिक्युरिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लि. या कंपनीला कंत्राट देताना विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने मेहरनजर दाखविली आहे. सव्वादोन कोटी रुपयांची निविदा मंजूर करताना विद्यापीठाच्या प्रशासनाने ‘एसएमके’ या कंत्राटदाराला नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. शिवाय विद्यापीठाची सुरक्षा करण्याऐवजी जणू लूट करण्याचाच परवाना दिल्याचे दिसत आहे. विद्यापीठामध्ये सुरक्षारक्षक पुरविण्यासंदर्भात जून २०१५ मध्ये जाहिरात देण्यात आली. ३० मार्च २०१६ रोजी ई- टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सुरक्षारक्षक भरती प्रकरणात घोटाळा..
By admin | Published: September 06, 2016 12:54 AM