औरंगाबाद ः पुढील वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत व वेळेत सुरू करण्यासाठी डाॅ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा झाल्यावर पदवी परीक्षा सुरू करून १५ मे पर्यंत सर्व पदवी परीक्षा घेवू. सर्व निकाल ३० दिवसांच्या आत लावून जुन महिन्यात सर्व निकाल जाहीर होतील. तर जुलैपासून द्वितीय व तृतीय वर्षाचे शिकवणी वर्ग सुरू होतील. तर प्रथम वर्षाच्या प्रवेशानंतर महिनाभरात तेही वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. अशी माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.
मुंबईत नुकतीच राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कुलगुरूंची (जेबीव्हीसी) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे. परीक्षा व निकालांचे सामायिक वेळापत्रक तयार करणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. आता पदवी परिक्षांचे नियोजन विद्यापीठ करत असून आहे. जेबीव्हीसीत दिलेल्या सुचनेच्या अनुशंगाने विद्यापीठात सोमवारी कुलगुरूंनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत नियोजनासंबंधी सुचना दिल्या.
१२ जानेवारी निकालाचा दुसरा टप्पापदवी परीक्षांचे पहिल्या टप्प्यात ४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यातील निकाल १२ जानेवारी रोजी जाहीर होतील. गेल्यावर्षी ९१ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत लागले होते. यावर्षी १०० टक्के निकाल वेळेत लावण्याच प्रयत्न आहेत. असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
आणखी ३९ महाविद्यालयांची होणार तपासणीपुढील शैक्षणिक वर्षांच्या सलग्नीकरणासाठी नॅक ३१ मार्चपुर्वी आवश्यक आहे. विस्तारिकरण, तुकडीवाढीसाठी ३५ प्रस्ताव आले आहेत. मात्र, नॅक, प्राचार्य, ५० टक्के पेक्षा अधिक मान्यताप्राप्त मनुष्यबळ असेल तरच त्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवणार आहोत. अकॅडमिक ऑडिटमध्ये दुसरा टप्पा सुरू करत आहोत. पहिल्या टप्प्यात २५ महाविद्यालयांतील भाैतिक सुविधांच्या पडताळणीसाठी समिती पाठवल्या. त्यांचे अहवाल येतील. आता पुढील टप्प्यात ३९ महाविद्यालयांची तपासणीला सुरूवात होईल. असे कुलगुरूंनी सांगितले.
३५ टक्के जागा जागा रिक्तपदवी महाविद्यालयात ३५ टक्के जागा गेल्या तीन वर्षांपासुन रिक्त राहत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने एकही नवे महाविद्यालय नको. असा प्रस्ताव पाठवला होता. तरीही ८ नवे स्थळबिंदू निश्चित झाले. राज्यात सर्वात कमी बिंदू विद्यापीठ कार्यक्षेत्रात दिल्याने या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.