शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

व्हॉट्सअ‍ॅपवर फुटला एमबीएचा पेपर, औरंगाबादेतील प्रकार; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 3:51 AM

एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअ‍ॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद : एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअ‍ॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा २६ डिसेंबरपासून सुरू आहेत. वसंतराव नाईक महाविद्यालयातील केंद्रावर एमबीएच्या ‘अकाऊंटिंग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर होता. परीक्षा हॉल क्रमांक ६ मध्ये देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा देत होता. दहा वाजता पेपर सुरू झाल्यानंतर शेखने ‘फ्यूचर मॅनेजर’ या दीडशे मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा स्नॅप टाकला. या ग्रुपचे सदस्य असलेले योगेश भवरे आणि मुज्जू शेख हे झाडाखाली बसून उत्तर लिहित होते. महाविद्यालयाच्या कर्मचाºयांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका दिसून आली. त्यानंतर दोघांना पकडून प्राचार्यांच्या कार्यालयात बसवून ठेवले. तसेच ज्या क्रमांकावरून प्रश्नपत्रिकेचा स्नॅप पाठवला, त्याचा डीपी पाहून परीक्षा हॉलची तपासणी केली. तेव्हा शेख अमजद परीक्षा देत असल्याचे दिसले. त्याने हॉलतिकिट फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाºयांनी त्याच्यासह तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.विद्यापीठाकडून पेपर रद्दविद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ.ं दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. मजहर फारुखी यांनी विद्यार्थ्यांचा रोष पाहून पेपर रद्द केल्याची घोषणा केली. 

टॅग्स :examपरीक्षा