खुलताबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने सण, उत्सव राजकीय कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. राज्यात कोरोना नियम शिथिल झाल्याने अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आता शासनाने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून केली जात आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. दोन महिन्यांपासून राज्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त झाली आहेत. मध्यंतरी कोरोनामुक्त भागात शाळा सुरू करण्याच्या शासनाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या; परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या दीड वर्षापासून नर्सरी, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद असल्याचा परिणाम लहान मुलांवर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अस्वस्थ झाले आहेत.
--
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी
शाळेत ऑनलाईनसाठी शिक्षक उपस्थित राहत आहेत. त्यानुसार शाळा सुरू केल्यास चांगलेच होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत शिस्तीत शाळा चालतील. मुलांचे बौद्धिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याची मागणी पालकाकडून देखील करण्यात येत आहे.
: सतीश कोळी, शिक्षक समिती, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख