शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
2
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
3
NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शही
4
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
5
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
6
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
7
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
8
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
9
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
10
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा
11
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
12
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
13
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
14
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
15
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
16
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
17
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
19
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
20
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते

चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

By मुजीब देवणीकर | Published: September 25, 2023 7:44 PM

या घटनेमुळे मनपात एकच खळबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रोजाबाग शाळेतील इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थिनी उम्मेखैर मुजम्मिल तय्यब ही वर्गात असताना सोमवारी दुपारी वॉचमनने खोलीला कुलूप लावले. थोड्या वेळानंतर मुलगी खिडकीजवळ येऊन रडू लागली. आसपासच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कुलूप तोडून चिमुकलीला बाहेर काढले. तथापि या घटनेनंतर पालकांनी मनपा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केली नाही. मात्र, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी स्वत: चौकशी सुरू केली.

नेहमीसारखी दुपारी २ वाजता शाळा सुटली; पण इयत्ता पहिलीतील उम्मेखैर ही चिमुकली वर्गातच राहिली. कंत्राटी वॉचमन विठ्ठल बमणे याने कुलूप लावले. शिक्षिका नर्गिस फातेमा यासुद्धा निघून गेल्या. कोंडली गेलेली चिमुकली वर्गखोलीच्या खिडकीजवळ येऊन जोरात रडू लागली. शाळेच्या परिसरात दिवसभर मुले खेळत असतात. त्यांना तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. लहान मुलांनी कॉलनीतील काही मोठ्या माणसांना बोलावून आणले. त्यांनी अगोदर घटनेचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर वॉचमन, शिक्षिका यांना फोनवर कळविले. ते परत येईपर्यंत परिसरातील नागरिकांनी कुलूप हातोड्याने तोडले. भेदरलेल्या चिमुकलीला बाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले.

शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशीमहापालिकेचे शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी सांगितले की, झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शिक्षिका आणि वॉचमनला बोलावून जबाब घेतला. मंगळवारी सकाळी मी शाळेत जाणार आहे. पालकांनाही बोलावून चर्चा करण्यात येईल. चौकशीत कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल. या भागातील काही रहिवाशांनी लग्नकार्यासाठी शाळेच्या परिसराची मागणी केली होती. शिक्षिकेने नकार दिला. त्यावरून काही वाद सुरू होते. त्यातून हा प्रकार घडवून आणल्याची तक्रार आहे. सर्व गोष्टींची शहानिशा केली जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducationशिक्षण