लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शाळेत शिक्षक, क्लार्क, शिपायाची नोकरी देण्याचा बहाणा करून पाच सुशिक्षित बेरोजगारांकडून ४६ लाख रुपये गंडविल्याचा गुन्हा फुलंब्री येथील भोईदेव शिक्षा संस्थेचे वानखेडे यांच्यासह तीन जणांवर सीटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले की, नांदेड येथील; परंतु हडकोतील रहिवासी दत्ता पोताजी चोपवाड या माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे राजेंद्र धोंडिबा वानखेडे, चंद्रकलाबाई वानखेडे आणि पल्लवी वानखेडे (काथोटे) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दत्ता चोपवाड यांचा लहान मुलगा महेश हा २०१४ साली बी.कॉम.नंतर डी.एड. करीत असताना त्यावेळी महेशचे सासरे श्रीराम डुबुकवाड यांनी सांगितले की, नातेवाईकाची फुलंब्रीत शिक्षण संस्था आहे. महेशला तेथे शिक्षक म्हणून नोकरीसाठी राजेंद्र वानखेडे यांच्याशी बोलण्याचे ठरले. जानेवारी-फेब्रुवारीत दत्ता पोपवाड यांची वानखेडे यांच्यासोबत चर्चा झाल्यावर मार्च महिन्यात वानखेडे यांनी भेटण्यासाठी बोलाविले. शिक्षक म्हणून नोकरीवर घेण्याविषयी चर्चा झाली. त्यांनी १४ लाख रुपयांची मागणी केली. त्यावरून ७ लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली. महेशला कामावर पाठवून द्या, हळूहळू सवय झाल्यावर नोकरीची आॅर्डर देण्याचे ठरले.
शाळेत नोकरीच्या आमिषाने ४६ लाखांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:16 AM