शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

औरंगाबादेत शालेय साहित्याचा बाजार फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:12 AM

नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील आठवड्यात प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी वाढू लागली आहे.

ठळक मुद्देखरेदीसाठी गर्दी : जीएसटी, मालट्रक भाडे वाढल्याने गणवेश महागले; वह्यांच्या भावाने संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील आठवड्यात प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी वाढू लागली आहे. कपड्यावर जीएसटी लागल्याने गणवेशाच्या किमती वाढल्या आहेत. काही व्यापारी एमआरपीनुसार, तर काही व्यापारी एमआरपीपेक्षा कमी किमतीत वह्यांची विक्री करीत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. शहरात मागील काळात झालेल्या दंगलीमुळे बाजारपेठेला मोठा फटका सहन करावा लागला होता.६० ते ७० टक्क्याने व्यावसायिक उलाढाल घटली होती; मात्र नवीन शैक्षणिक वर्ष व रमजान महिना यामुळे बाजारात चहलपहल वाढल्याने व्यापारी वर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे.गणवेश १२ टक्क्याने महागलेकपड्यांवर पूर्वी कोणताही टॅक्स नव्हता; मात्र आता ५ टक्के जीएसटी लागत आहे, तसेच मालवाहतूक भाडे वाढल्यामुळे १२ टक्क्याने गणवेश महाग झाले आहेत. बाजारात ६० टक्के गणवेश सोलापूर, तर ४० टक्के गणवेश भिवंडी येथून मागविले जातात.सर्वसाधारण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा हाफ शर्ट व हाफ पँट ३५० रुपयांत, फूल पँट व हाफ शर्ट ४५० रुपयांत मिळत आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांचे फुलपँट व हाफ शर्ट ६०० रुपयांना मिळत आहे. इयत्ता पहिलीमधील विद्यार्थिनींचा गणवेश ३६० ते ४०० रुपये, तर १० वीतील विद्यार्थिनींचा पंजाबी ड्रेस गणवेश ४०० ते ४२५ रुपयांत विकला जात आहे. ब्लेझर ८०० ते १३०० रुपयांदरम्यान विकले जात आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, एक शाळा वगळता अन्य कोणत्याही शाळेने यंदा गणवेश बदलले नाहीत. हाच पालकांसाठी दिलासा.वह्यांच्या किमतीत तफावतबाजारपेठेत मुबलक प्रमाणात वह्या उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, काही स्टेशनरी विक्रेते एमआरपीनुसार तर काही विक्रेते एमआरपीपेक्षा कमी किमतीत वह्या विकत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच २४ बाय १८ सें.मी. व २७ बाय १७ सें.मी आकारातील वह्या विकल्या जातात. मात्र, पहिल्यांदाच बाजारात २०.३ बाय २५.५ सें.मी. आकारातील वह्या आल्या आहेत.त्याही ठराविक दुकानातच मिळत आहे. बाजारातील किमतीपेक्षा या वह्यांची किंमतही अधिक आहे. मात्र, शाळांच्या सक्तीमुळे नाइलाजाने पालकांना या वह्या खरेदी कराव्या लागत असल्याचे दिसून येतआहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादMarketबाजार