पाठशाला प्री-प्रायमरी स्कूलचे वैशिष्ट म्हणजे या शाळेत पालक आपल्या पाल्यांना प्रवेश देतात त्याच वेळेस वर्षभरात शिकविण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यांचे किट दिले जाते. त्यात ५०० पेक्षा अधिक खेळण्याचे किट असते. या नुसत्या खेळण्या नसतात, तर त्यातून बालकांना ज्ञान प्राप्त होतेच, शिवाय त्या ज्ञानाचा कसा वापर करतात याचाही बोध होतो. उदा : कार, टू व्हिलर पार्किंगचे मॉडेल असते. यात अपार्टमेंटमध्ये अन्य ठिकाणी कार, टू व्हिलर कशी पार्किंग केली जाते याची माहिती मिळते. विविध प्रकारचे पक्षी, फळ, भाज्याचे कट आऊट दिलेले असतात. कट आऊटशी खेळत खेळत त्याची भाज्यांशी ओळख होते. मायबॉडी, फेस्टिव्हल, ट्रान्स्पोर्ट याचे कटआऊट बघून मुले शिकतात. अराऊंड द वर्ल्ड थिममध्ये चीन देशाचे कीट असेल तर त्यात तेथील संस्कृती, पेहरावा, चिनी भिंत, हातपंखे, तेथील खाद्यपदार्थ याची चित्रे असतात. शिक्षक ते कट आऊट दाखवून चिमुकल्यांना माहिती देतात. ते कट आऊटनंतर मुले आपल्या आई-वडिलांना दाखवून त्याचा उच्चार करतात. यामुळे ती थिम त्या मुलांच्या मनात रुजते व अशा कटआऊटच्या माध्यमातून मुले तो विषय पटकन ग्रहण करतात. फ्लाश कार्ड, टीचर्स हँडबुक, अनिमेशन, स्लाईड शो, ऑडिओ-व्हिडिओ रिम्स, वर्कसीट, इ-बुक, अल्फाबेट स्टोरीज् असे साहित्य असते. मुलासोबत ऑनलाईन शिक्षणात त्याची माहिती दिली जाते. दररोज एक थीमनुसार हे शिकविले जाते. हे साहित्य घरीच असल्याने मूल दिवसभर त्याचा वापर करीत असतात, सतत ते साहित्य हाताळल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढते. पालकांना आपला पाल्य वर्षभरात काय शिकणार आहे याचा अंदाज पहिल्याच दिवशी हे शैक्षणिक कीट पाहिल्यावर येऊन जातो. हेच या शाळेच्या नावीण्यपूर्ण शैक्षणिक पद्धतीचे वैशिष्ट होय.
चौकट
यंदा पहिल्या वर्गात प्रवेश
पाठशाला प्री-प्रायमरीचे यंदा तिसरे शैक्षणिक वर्ष आहे. येथे प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के. जी., सिनिअर के.जी.ला प्रवेश दिला जातो. पहिल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेतले. नावीण्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे मुलांमध्ये बौद्धिक क्षमता, आकलनात होणारी वाढ पालकांना प्रखरतेने जाणवल्याने अनेकांनी येथे इयत्ता पहिलीचा वर्ग म्हणजे फस्ट स्टँडर्ड सुरू करण्याचा आग्रह धरला. मागील वर्ष कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र, त्यातही चिमुकल्यांना शाळेची असलेली नाळ जोडून ठेवण्यात पाठशालेतील शिक्षकांना यश आले. यंदा पालकांच्या आग्रहास्तव इयत्ता पहिलीचा वर्गात प्रवेश देणे सुरू केले आहे. सरकारी नियमांचे पालन करीत ऑनलाईन वर्ग होणार आहेत.
चौकट
एका वर्गात फक्त १५ विद्यार्थी
पाठशाला प्री प्रायमरी स्कूलचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का होण्यासाठी व त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांना वैयक्तिक लक्ष देता यावे, म्हणून प्रत्येक वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गुणवत्तेवर अधिक लक्ष दिले जाते. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
(पाठशाला प्री प्रायमरी स्कूल जोड १)