शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भरविली शाळा

By admin | Published: June 15, 2017 11:28 PM

परभणी : मानवत तालुक्यातील सारंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांच्या दालनासमोरच शाळा भरविली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानवत तालुक्यातील सारंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या दालनासमोरच गुरुवारी शाळा भरविण्यात आली़ जवळपास ५ तास चाललेल्या आंदोलनामध्ये ३ शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़सारंगापूर येथील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर ३ व प्राथमिक शिक्षकांची ५ अशी ९ पदे मंजूर आहेत़ त्यापैकी मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षकांची ४ पदे कार्यरत होती. मागील तीन वर्षामध्ये येथून तीन शिक्षक बदलून गेल्याने दोनच शिक्षक कार्यरत आहेत़ १५ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती; परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पालक व विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषद गाठली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यी थांबले होते़ परंतु, खोडवेकर यांनी त्यांची भेट घेणे टाळले़ पालक मात्र खोडवेकर यांच्याशी चर्चा करण्यावर ठाम होते़ पालक व विद्यार्थी आक्रमक होत असल्याचे पाहून एका कर्मचाऱ्याने खोडवेकर यांच्या दालनास बाहेरून कुलूप लावून घेतले़ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी खोडवेकर हे त्यांच्या दालनामध्येच बसून होते़ त्यामुळे पालक व विद्यार्थी आणखी आक्रमक झाले़ त्यांनी दालनासमोरच राष्ट्रगीत सुरू केले़ त्यानंतर पाढे म्हणण्यास सुरुवात केली़ तरीही खोडवेकर हे भेटण्यास येत नसल्याने विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरु केली़ यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हेही कर्मचाऱ्यांसमवेत हजर झाले़ तसेच ही माहिती आ़ राहुल पाटील यांना समजताच त्यांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेतली़ तर जि. प. सदस्य समशेर वरपूडकर, प्रभू जैस्वाल हेही दाखल झाले़ आ़ राहुल पाटील आल्यानंतर सीईओ खोडवेकर यांच्या दालनाचे कुलूप उघडण्यात आले़ बंद दरवाज्याआड आ़ पाटील व खोडवेकर यांच्यामध्ये चर्चा झाली़ त्यांच्या चर्चेमध्ये नेमके काय ठरले हे मात्र समजू शकले नाही़ दरम्यान, उपशिक्षणाधिकारी नासेर खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली़ तसेच शाळेला शिक्षक उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली़ परंतु, पालक व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर हे प्रत्यक्ष चर्चा करणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी भूमिका घेतली़ काही वेळ थांबल्यानंतर आ. पाटीलही रागाने जि. प. तून निघून गेले. ते गेल्यानंतरही काही वेळ विद्यार्थी कक्षासमोर बसून होते़ शेवटपर्यंत खोडवेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला नाही.