औरंगाबाद : काय आपल्या चिमुकल्या मुलासाठी प्री-प्रायमरी शाळेच्या शोधात आहात मग जरा थांबा. कारण, आपल्या पाल्यास आपणास नुसते परीक्षा पास होण्यापुरते ज्ञान द्यायचे आहे की, त्याचा बौद्धिक विकास घडवून आणायचा आहे, याचा विचार पहिले करा. बालवयात जे संस्कार, ज्ञान रुजविले जाते त्यावरच आयुष्य घडते. संस्कारक्षम ज्ञानासोबत त्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने कसा व कुठे करायचा याची समज जर बालवयात झाली तर हेच व्यावहारिक ज्ञान त्यांचे उज्वल भविष्य घडण्यास प्रेरक ठरते. हाच उद्देश समोर ठेवून प्रतापनगरमध्ये ‘पाठशाला प्री-प्रायमरी स्कूल’ सुरु करण्यात आली आहे. यामुळे ॲडमिशनचा निर्णय घेण्यापूर्वी या शाळेला एकदा भेट द्या आणि मग निर्णय घ्या.
पुस्तकी ज्ञानासोबत हसत, खेळत, बागडत, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, अनुभवातून पण तेही तणावमुक्त शिक्षण देणे हेच या ‘पाठशालेची वैशिष्ट्ये होत. म्हणूनच लॉकडाऊनच्या काळाताही बच्चे कंपनी शाळेत जाण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करीत होती, हेच या शाळेचे यश होय.
लहान मुले शाळेत जाण्यासाठी घाबरतात, शिक्षकांविषयी व शिकण्याविषयी त्यांच्या मनात भीती असते. यामुळे शाळेत जाताना अनेक मुले रडून गोंधळ घालतात. पण पाठशाळा प्री-प्रायमरी स्कूलमध्ये मात्र, या उलट वातावरण बघण्यास मिळते, चिमुकले वेळेआधी शाळेत येतात व येथेच रमून जातात, घरी जाण्याचे भानही त्यांना राहत नाही. घरी गेले तरी आई, आजोबा, आजीकडे पुन्हा शाळेत चला म्हणून हट्ट करतात, हे लॉकडाऊन आधीचे चित्र आजही कायम आहे. ऑनलाईन शिक्षणमध्ये चिमुकले रस घेतातच शिवाय शाळेत कधी जायचे, असा हट्ट अजूनही करतात, मागील वर्षभरात ऑनलाईन असूनही शाळेची ओढ काही कमी झाली नाही. हे घडले फक्त ‘पाठशाला प्री प्रायमरी स्कूल’मधील नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळेच.
चौकट
५ वर्षांच्या संशोधनाअंती निर्माण झाली १०० टक्के क्रियाशील शिक्षणपद्धत
पाठशाला प्री प्रायमरी स्कूलमध्येच का बालकांना प्रवेश द्यायचा, असा प्रश्न पालकांना पडला असेल. मात्र, याविषयी शाळेचे संचालक अभिमानाने व संपूर्ण आत्मविश्वासाने सांगतात की, ५ वर्षाच्या संशोधनाअंती शाळेने नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धत तयार केली आहे. एक असा अभ्यासक्रमही तो चिमुकल्यांना हसत खेळत, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह त्यांच्या मनात रुजेल व त्यांना त्याची आवड निर्माण करेल. १०० टक्के ॲक्टिव्हिटी बेस्ड थीम निर्माण केली आहे. खेळातून बालकांमध्ये शाळा व शिक्षणाची गोडी निर्माण होते. येथे प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनिअर केजीच्या छोट्या मुलांना शाळेतर्फे वर्षभरात जवळपास ५८० खेळणी देण्यात येतात. या खेळणी काही साधारण नसतात. त्यातून त्यांना ज्ञान मिळतेच. त्या ज्ञानाचा योग्यप्रकारे कसा वापर करायचा हे त्यातून मुले शिकतात. अशा नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे बालकांचा बौद्धिक विकास झपाट्याने होतो. आकलनशक्ती वाढते. हे येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आचरणातून सिद्ध झाले आहे.
(पाठशाला प्री प्रायमरी स्कूल एलएमएससाठीचे पहिले मॅटर.)