चितेगाव : सिमेंट बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी ७ वाजेदरम्यान चितेगाव येथे उघडकीस आली. ओम अजय खेडकर (१३) असे मयत मुलाचे नाव आहे.
चितेगाव येथील धिल्लननगरमध्ये राहत असलेले अजय खेडकर हे गावी गेले होते. घरी त्यांची पत्नी व मुलगा ओम होता. सायंकाळी ५ वाजेदरम्यान ओम मित्रांबरोबर गावाजवळील नदीवर बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी रात्रभर मुलगा घरी न आल्याने शुक्रवारी सकाळी आई व नातेवाईक त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले. तो कोणत्या मुलांबरोबर होता, हेही कळायला तयार नव्हते. तसेच कोणी काही सांगत नव्हते. नदीवरील बंधाऱ्याजवळ ओमचे कपडे त्यांना आढळून आले; परंतु आजूबाजूला व पाण्यात काहीच दिसून येत नव्हते. त्यानंतर काही तासांनी ओमचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ओमचे आजोळ चितेगाव असून, त्याचे आईवडील येथे कामधंद्यासाठी वास्तव्यास होते. मयत ओम याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि संतोष माने करीत आहेत.
फोटो..
240921\20210924_191530.jpg
मयत ओम अजय खेडकर चितेगाव