वाळूज महानगर: बजाजनगरातील भगवान महावीर शाळेत विज्ञान प्रदर्शन शिबीर भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन भारतीय जैन संघटनेच्या जयश्री चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विद्या तौर, संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल शिंगी, उपाध्यक्ष पद्माकर कदम, पारस चोरडयिा, किशोर राका, संभाजी राचुरे, मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले आदींची उपस्थिती होती. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध प्रयोग सादर करुन या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
या प्रसंगी श्वसन संस्था, मेंदु, कान, डोळे, किडनी आदींची कार्य प्रात्याक्षिकाद्वारे उपस्थिांना दाखवून दिले. स्मार्ट होम, रोपवेची कार्यपद्धती ,टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आदींसह वेगवेगळे प्रयोग सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची शाबासकी मिळविली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले, अनुराधा पवार, सरिता लुटे, प्रियंका अमिलकंठवार, पुजा पवार, सोनाली चौधरी, कृष्णा राऊत, विशाल कांबळे आदीसह शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.