शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

संगणक हाताळणाऱ्या विद्यार्थिनींच्या हाती खुरपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 9:29 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या हाती प्रशासनाने खुरपे दिले आहे.

ठळक मुद्देविद्यापीठातील प्रकार : कौशल्याधारित कामे देण्याची आमदार चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या हाती प्रशासनाने खुरपे दिले आहे. या विद्यार्थिनी कमवा आणि शिका योजनेत काम करतात. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थिनी गावाकडेही खुरपण्याचे काम करीत होत्या. विद्यापीठात आल्यानंतरही त्यांच्या हाती खुरपेच दिले जाणार असेल तर प्रगती कशी होणार? असा सवाल करून या विद्यार्थिनींना कौशल्याधारित कामे देण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.आ. चव्हाण यांनी सोमवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता विद्यापीठातील उद्यानात कमवा व शिकाच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा या विद्यार्थिनी गवत खुरपत होत्या. यात संगणक, रसायनशास्त्र, तंत्रज्ञान आदी विभागातील विद्यार्थिनीही होत्या. कोणत्याही विभागातील विद्यार्थिनी असल्या तरी त्यांना कौशल्याधारित कामे देण्याऐवजी खुरपण्याचे काम देण्यात आले. या विद्यार्थिनींना काम केल्यानंतर सही करण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते. ९.१५ वाजेपर्यंत या विद्यार्थिनी तेथे असतात. यातील अनेक जणींना सोमवारी १० वाजता विभागात परीक्षा देण्यास जायचे होते. तरीही त्यांना लवकर सोडण्यात आले नाही, अशा प्रकारची अमानवी, अमानुष वागणूक आपण विद्यार्थिनींना देत आहोत, याचे भानही प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले होते. विद्यार्थिनींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मुली पाण्यासाठी बॉटल घेऊन सर्वत्र फिरतात. एक बाटली पाणी मिळत नाही. एकाही विद्यार्थिनींच्या वसतिगृहात खानावळीची सुविधा नाही. स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील दीड वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केलेली नाही. अनेक मुली आजारी पडलेल्या आहेत. त्यांना तपासण्यासाठी विद्यापीठात एकही महिला वैद्यकीय अधिकार नाही. याविषयीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.दिवाळीनंतर विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर हा प्रश्न आमच्या पद्धतीने सोडविण्यात येईल, असा इशाराही आ. चव्हाण यांनी दिला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य डॉ. स्मिता अवचार, डॉ. राम चव्हाण, प्रा.सुनील मगरे, डॉ. भारत खैरनार, शेख जहूर, विद्यापरिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्यासह डॉ. संभाजी वाघमारे, अमाले दांडगे, मयूर सोनवणे, अक्षय पाटील, दीक्षा पवार आदी उपस्थित होते.प्राध्यापकांना बंदी अन् कुलगुरू दौºयावरविद्यापीठातील प्राध्यापक, अधिकाºयांना सुटी घेण्याची, दौºयावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कुलगुरू प्रभारी अधिकाºयांना घेऊन परदेश दौºयावर कसे जातात? असा सवालही आ.चव्हाण यांनी उपस्थित केला. विद्यापीठात अनेक सेवानिवृत्तांना हजारो रुपये पगार देऊन सल्लागार म्हणून नेमले. हे लोक काय सल्ला देतात. त्यांच्यावर फसवणूक करून पगार उचलतात याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही आ. चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठ