शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

By विकास राऊत | Published: September 04, 2023 12:35 PM

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याच्या महसुली नोंदी व इतर पुराव्यांची रविवारी दिवसभर आठही जिल्ह्यातील अभिलेख कक्षांमध्ये शोधाशोध सुरू होती. सुटीच्या दिवशी सर्व तहसील पातळीवरून पुराव्यांची जमवाजमव करण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होणाऱ्या तातडीच्या बैठकीत हे सगळे पुरावे मांडण्यात येणार आहेत. बैठकीला विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड जाणार आहेत. तसेच मंगळवारी अप्पर सचिवांकडे देखील आरक्षण अनुषंगाने बैठक होत आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अंतरवालीकडे धाव घेतली. विरोधी पक्षाने आंदोलकांची भेट घेतल्यावर राज्य सरकारवर टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडींदरम्यान शासनाने प्रशासकीय यंत्रणेकडून महसुली दस्तावेजांची माहिती मागविली आहे. मराठवाड्यातील १९५१-५२ या सालापासूनचे खासरापत्र, पाहणी अहवाल, महसुली नोंदीचे पुरावे शोधण्यासाठी शासनाकडून विभागीय आयुक्तांना शनिवारी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी पूर्ण जिल्हा पातळीवरून महसुली नोंदींची माहिती मागविली. रविवारी दिवसभर आठही जिल्ह्यातील अभिलेख कक्ष महसुली दस्तांची जंत्री उघडून बसले होते.

उघडली महसुली अभिलेखाची जंत्री ....खासरा पत्रांचा रेकॉर्ड तपासणीसाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त मधुकरराजे यांनी आदेश दिले होते. रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. दरम्यान विभागीय आयुक्त आर्दड यांनी सांगितले, महसुली दस्तांची माहिती घेण्यात येत आहे. जालना, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणच्या खासरा पत्रांवर कुणबी अशा नोंदी आढळून आल्या आहेत. जेवढे पुरावे सापडतील, तेवढे सोमवारच्या बैठकीसमोर ठेवण्यात येतील. सर्व जिल्ह्यातून पुराव्यांची माहिती घेणे पुढील काही दिवस सुरू राहील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन