लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोडवरील केम्ब्रिज शाळेजवळ मॉर्निंग वॉकला जाणाºया चार जणांना चिरडण्याच्या घटनेला ३६ तास उलटल्यानंतरही जीपचालक पोलिसांना सापडला नाही. अपघात करणारी जीप ही अचलपूर (जि. अमरावती) येथील ऋषभ जैन यांच्या मालकीची असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी अमरावती पोलिसांमार्फत जीप मालकास हजर होण्याचे कळविले आहे.एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी म्हणाले की, शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने मॉर्निंग वॉक करणाºया सहा जणांना चिरडले. या भीषण घटनेत भागीनाथ लिंबाजी गवळी (५६), नारायण गंगाराम वाघमारे (६५), दगडूजी बालाजी ढवळे (६५) आणि अनिल विठ्ठल सोनवणे (४५, सर्व रा. हनुमान चौक, चिकलठाणा) हे ठार झाले होते, तर विजय करवंदे आणि लहू तुळशीराम बकाल (४५) हे जखमी झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात सुसाट जीपचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. अपघात झाल्यापासून जीपचालक पसार झालेला आहे. पोलिसांनी घटनेनंतर जीप जप्त केलेली आहे. या क्रमांकावरून जीपमालकाचे नाव ऋषभ जैन असल्याचे समोर आले. पिरतवाडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या अचलपूर येथील ते निवासी आहेत. यामुळे पिरतवाडा पोलिसांमार्फत जैन यांच्या घरी निरोप पाठवून त्यांना एमआयडीसी सिडको ठाण्यात सोमवारी सकाळी हजर राहण्याचे कळविले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.
‘त्या’ पसार जीपचालकाचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:33 AM