औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा तृतीयपंथीय मतदारांचा शोध घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाही तृतीयपंथीय मतदाराची नोंद झालेली नाही. त्यामुळे निवडणूक शाखेकडून विविध संस्थांशी पत्रव्यवहार करून या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात आहेत.निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत स्त्री आणि पुरुष अशा दोनच गटांतील मतदारांची नोंद होत असते. मात्र, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीय मतदारांची स्वतंत्र नोंद करावी, असा आदेश दिला. त्यामुळे आयोग आता तृतीयपंथीय मतदारांची नोंद इतर या गटात करीत आहे; परंतु औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकाही तृतीयपंथीय मतदाराची नोंद झालेली नाही. तृतीयपंथीयांचे जिल्ह्यात वास्तव्य असूनही मतदार म्हणून मात्र त्यांची स्वतंत्र नोंद नाही.
तृतीयपंथीय मतदारांचा शोध
By admin | Published: September 11, 2014 1:23 AM