औरंगाबाद : जिल्ह्यात एक दिवस जोरदार पाऊस बरसल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसात खंड पडला आहे.
जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७१.८० टक्के पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद तालुक्यात झाला. औरंगाबाद तालुक्यात १०६.७६ टक्के, फुलंब्री तालुक्यात ८२.६२ टक्के, पैठण तालुक्यात ६५.९२, सिल्लोड तालुक्यात ६० टक्के, सोयगाव तालुक्यात ६६.२७ टक्के, कन्नड तालुक्यात ६८.८४ टक्के, वैजापूर तालुक्यात ८०.२६ टक्के, गंगापूर तालुक्यात ६५.३२ तर खुलताबाद तालुक्यात ५६.७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात १६ आॅगस्ट रोजी श्रावणसरींनी १८ तास हजेरी लावली. शहरात १७ जुलै रोजी ४९ मि. मी. पावसाची नोंद झाली. तब्बल महिनाभरानंतर गुरुवारी १२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यांनतर पावसाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाठ फिरविली आहे.