छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना अपघात विमा दिला जातो. या ११ महिन्यांत कामगारांनी क्लेम टाकले असून, त्यापैकी कामावर जखमी होऊन तो मृत्यू पावलेला असल्यास त्याला विम्याचा लाभ देण्यात येतो. गतवर्षी किमान ५०च्या जवळपास कामगारांना २५ लाखाच्या जवळपास विम्याचा लाभ झाला आहे. बहुतांश फायली अद्यापही पेंडिंग आहेत, त्यावर काही विचार देखील झालेला नाही, कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
काय आहे योजना?अपघात विमा ही योजना कामगारांचा कामाच्या दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्यास तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. त्याच्या कुटुंबीयाला तो विम्याचा लाभ घेता येतो. जखमी असल्यास त्यास उपचारासाठी देखील निधी उपलब्ध केला जातो. हंगाम कामगार नोंदणी केली की त्याचा विमाही उतरविला जातो.
नोंदणी कशी करणार?दरवर्षी तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे असून, ती नोंदणी केल्यावर सरकारने ठरवून दिलेल्या योजनेत तुम्हाला लाभ घेता येतो. अपघात तसेच इतर गंभीर आजारी असल्यास तुम्हाला त्यावेळी दवाखान्यात उपचार देखील घेणे सोयीचे होते. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष ही कार्यालयात जाऊन तुम्हाला नोंदणी करणे शक्य आहे.
निकष काय?या योजनेअंतर्गत कामगाराला महिना फक्त १/- रुपये भरून २ लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेता येईल. कामगार कोणत्या ठेकेदाराकडे काम करतो, त्याची नोंदणी अपडेट असावी, एकाच ठिकाणी विम्याचा लाभ घेता येईल त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे.
किती विमा मिळतो?दोन लाखाचा विमा असून, त्यात कामगारांचा विमा उतरविला जातो. इतरही त्याला किरकोळ लाभ दिले जातात, त्याचा क्लेम तुम्हाला रीतसरपणे कार्यालयाकडे दाखल करावे लागतात.
जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असावाआर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणाने तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.
विमा योजनेचा लाभया सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.- कामगार आयुक्त